काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानातील सत्ताधारी तालिबानने इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनेत भरती होण्यासाठी पोचलेल्या एका भारतीय तरुणाला अटक केली आहे. सनौल इस्लाम असे त्याचे नाव असून तो केरळचा रहाणार आहे. याविषयी भारतीय यंत्रणांनी अद्याप स्पष्टपणे काहीही सांगितलेले नाही.
तालिबानचा दावा आहे की, सनौल इस्लाम ताजिकिस्तान मार्गे कंदाहार येथे पोचला. तालिबानचा आरोप आहे की, सनौलचे इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत या आतंकवादी संघटनेशी संबंध आहेत. आतंकवादी कारवाया करण्यासाठी कट रचण्याच्या उद्देशाने तो त्याच्या प्रमुखाचे साहाय्य घेण्यासाठी आला होता. सनौल इस्लामकडून भारतीय पारपत्र जप्त करण्यात आल्याचे तालिबानचे म्हणणे आहे.
सौजन्य:Kadak
संपादकीय भूमिकाकेरळमधील धर्मांध मुसलमान आतंकवादी बनण्यासाठी इस्लामी देशांत जातात, हे भारतीय गुप्तचर यंत्रणांना का कळत नाही ? याविषयी देशातील इस्लामी संघटना का बोलत नाहीत ? |