|
हाथरस (उत्तरप्रदेश) : हाथरस जिल्ह्यातील खेरिया गावात एका हिंदु व्यक्तीचा मृतदेह तो मुसलमान असल्याचे समजून एका सामाजिक सेवा संस्थेने स्मशानभूमीत पुरल्याची घटना समोर आली आहे. आता मृतदेह कबरीतून बाहेर काढून कह्यात देण्याची मागणी या तरुणाच्या कुटुंबियांनी केली आहे.
हाथरस जिल्ह्यातील खेरिया गावात २३ फेब्रुवारी या दिवशी रेल्वे रुळाजवळील शेतात व्यक्तीचा मृतदेह पडलेला आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेह कह्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनात मृत व्यक्ती मुसलमान असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. त्यानंतर एका सामाजिक सेवा संस्थेने या मृतदेहावर मुसलमान पद्धतीने अंत्यसंस्कार केले होते. आता मृताचे नाव ४० वर्षीय अमित हरिजन असून तो आसाम राज्यातील होजई जिल्ह्यात असलेल्या लुमडिंग येथील रहिवासी आहे, असे उघड झाले !
(सौजन्य : Amar Ujala Uttar Pradesh)
संपादकीय भूमिकाया अक्षम्य चुकीसाठी आरोग्य विभागातील संबंधितांवर कठोर कारवाई केली पाहिजे ! |