छत्रपती संभाजीनगर – विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे वडील एकनाथराव आनंदराव दानवे यांचे १६ फेब्रुवारी या दिवशी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सगुणाबाई दानवे, ४ मुले अंबादास दानवे, देविदास दानवे, राजेंद्र दानवे, आणि अनिल दानवे यांच्यासह ४ सुना, तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे.