Pakistan Support Maldives : दिवाळखोर पाकचे मालदीवला ‘आर्थिक साहाय्य करू’, असे आश्‍वासन !

भारताने मालदीवला देण्यात येणार्‍या आर्थिक साहाय्यामध्ये केली कपात !

मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू व पाकचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर

इस्लामबाद (पाकिस्तान) – भारताने मालदीवला दिलेले आर्थिक साहाय्य २२ टक्क्यांनी अल्प केल आहे. वर्ष २०२४-२५ आर्थिक वर्षात मालदीवच्या विकासासाठी केवळ ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ही रक्कम ७७० कोटी ९० लाख इतकी होती. विविध योजनांतर्गत हे साहाय्य दिले जात होते. भारताने साहाय्य घटवल्यानंतर पाकने मालदीवला विकास कामात आर्थिक साहाय्य देण्याचे आश्‍वासन दिले आहे. पाकचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर यांनी मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू यांच्याशी दूरभाषवर चर्चा करतांना हे आश्‍वासन दिले.

संपादकीय भूमिका

स्वतःच दुसर्‍याकडे भीक मागून दिवस ढकलणारा पाकिस्तान म्हणे मालदीवला आर्थिक साहाय्य करणार, यापेक्षा दुसरा विनोद नाही ! ‘पाकने मालदीवला साहाय्य करावे’, हे पाकच्या नागरिकांना तरी मान्य आहे का ?