Bangladesh India Out Campaign : बांगलादेशमध्ये विरोधी पक्षाकडून भारतावर बहिष्कार घालण्याची चळवळ !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशामध्ये ‘इंडिया बायकॉट’ ही भारतविरोधी चळवळ चालू करण्यात आली आहे. येथील प्रमुख विरोधी पक्ष ‘बांगलादेश नॅशनल पार्टी’शी (बी.एन्.पी.शी) संबंधित राजकीय पक्ष ‘जन अधिकार परिषदे’ने सामाजिक माध्यमांतून ही चळवळ चालू केली आहे. याद्वारे भारतीय उत्पादनांना लक्ष्य केले जात आहे. लोकांना भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यास सांगितले जात आहे. विशेष म्हणजे ही चळवळ डॉ. पिनाकी भट्टाचार्य याने प्रथम चालू केली. भट्टाचार्य हा जरी हिंदु धर्मीय असला, तरी तो हिंदुद्वेषी असून तोे बांगलादेशातील धर्मांधांचे समर्थन करतो. या चळवळीत सुमारे ५ लाख लोक सहभागी झाले आहेत.

(सौजन्य : StudyIQ IAS)

१. भारताने सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान शेख हसीना यांना साहाय्य करत आमच्या लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप केला, असा बी.एन्.पी.चा आरोप आहे. यातूनच बहिष्काराची चळवळ राबवली जात आहे.

२. भारत बांगलादेशाला प्रतिवर्षी १ कोटी १६ लाख कोटी रुपयांच्या साहित्याची निर्यात करतो. बांगलादेश भारतावरच अनेक गोष्टींसाठी अवलंबून असतांनाही भारतीय उत्पादनांविरुद्ध चळवळ राबवली जात आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील विरोधी पक्ष कट्टर जिहादी विचारसरणीचा असल्याने यात आश्‍चर्य काही नाही; मात्र सत्ताधारी शेख हसीना सरकारने अशी चळवळ राबवणार्‍यांवर कठोर कारवाई करून ही चळवळ मोडून काढली पाहिजे !