एकाने श्रीमहाराजांना (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना) विचारले, ‘मंदिरामध्ये दगडाचे कासव आणि घंटा असते. त्यांचा अर्थ काय ?’ श्रीमहाराज म्हणाले, ‘देवाच्या गाभार्याच्या बाहेर कासव असते. आपल्याला हवे तेव्हा कासव आपले अवयव पोटात घेते. भगवंताच्या दर्शनास जाण्याच्या अगोदर कासवाप्रमाणे साधकाने आपली इंद्रिये आत खेचून घेण्याची युक्ती साधली पाहिजे.
घंटानाद हा ओंकाराचा व्यक्त नाद आहे. तो नामरूपच आहे. घंटानाद करून मग देवाचे दर्शन करायचे असते, तसेच भगवंताच्या नामाचा जयघोष करूनच भगवंताच्या दर्शनास भक्त सरसावतो.’
(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक : ल.ग. मराठे)