|
नवी देहली : पंतप्रधान मोदी यांनी आयोध्यानगरी स्वच्छ ठेवण्याचे आवाहन ‘इन्टाग्राम’वर एक व्हिडिओ प्रसारित करून केले आहे. यात त्यांनी ‘देशभरातील नागरिकांना माझी प्रार्थना आहे की, भव्य श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या एक आठवडाआधीपासून, म्हणजे मकरसंक्रातीपासून देशातील लहान-मोठ्या मंदिरांच्या स्वच्छतेचे अभियान राबवले पाहिजे. हे अभियान १४ ते २२ जानेवारी या कालावधीत राबवले पाहिजे’, असे आवाहन केले आहे.
(सौजन्य : India Today)
Prime Minister Narendra Modi appeals to every Indian.
Urges everyone to launch a cleanliness drive in temples across the country from 14th to 22nd January.
He added:
– It is the responsibility of every resident of Ayodhya to keep Ayodhyanagari clean everyday.– No… pic.twitter.com/iRGeRfuaDb
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 3, 2024
प्रभु श्रीरामांचे आगमन होत असतांना एकही मंदिर आणि तीर्थक्षेत्र अस्वच्छ राहू नये !
पंतप्रधानांनी अयोध्येतील नागरिकांना म्हटले की, आता देश-विदेशांतून प्रतिदिन मोठ्या संख्येने लोक येत रहाणार आहेत. त्यामुळे अयोध्यावासियांनी एक संकल्प केला पाहिजे की, रामनगरी देशातील स्वच्छ शहर बनवणार. स्वच्छ अयोध्या बनवण्याचे दायित्व अयोध्यावासियांचे आहे. प्रभु श्रीराम सर्वांचे आहेत. भगवान श्रीरामांचे आगमन होत असतांना आपले एकही मंदिर आणि तीर्थक्षेत्र अस्वच्छ राहू नये.