RJD MLA Controversial Statement : बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाचे आमदार फतेह बहादुर सिंह कुशवाहा यांची श्री सरस्वतीदेवीवर अश्‍लाघ्य टीका

शाळांमध्ये श्री सरस्वतीदेवी ऐवजी सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा लावण्याची मागणी !

पाटलीपुत्र (बिहार) – बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाचे (‘राजद’चे) आमदार फतेह बहादुर सिंह कुशवाहा यांनी विद्येची देवता श्री सरस्वतीदेवीवर अश्‍लील टीका केली आहे. त्यांनी शाळांमध्ये श्री सरस्वतीदेवीची प्रतिमा लावण्याऐवजी सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा लावण्याची मागणी केली. ते पत्रकारांशी बोलत होते. ७ जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे विधान केले. आमदार कुशवाहा यांनी म्हटले की, तुमच्याच ग्रंथांमध्ये लिहिले आहे की, सुरसती (सरस्वती) जी ब्रह्माची मुलगी आहे, तिच्यावर ब्रह्माची दृष्टी पडली आणि त्याने सुरसतीशी विवाह केला. यावरून तुम्ही समजू शकता की, पूजा कुणाची होते, चरित्रहिनाची कि चरित्रवानाची ? हे मी नाही, तर कबीर यांनी म्हटले आहे.

आमदार कुशवाहा यांनी यापूर्वी श्री दुर्गादेवीवरही केली होती अश्‍लील टीका !

आमदार कुशवाहा यांनी यापूर्वी श्री दुर्गादेवीवर टीका करतांना ‘दुर्गादेवीची कथा काल्पनिक आहे’, असे म्हटले होते. ‘जर दुर्गादेवीचे अस्तित्व आहे, तर ब्रिटिशांचे राज्य असतांना तिने भारताला का नाही वाचवले ?’ असा प्रश्‍न विचारला होता. कुशवाह यांनी स्वतःला ‘महिषासुराचे वंशज’ म्हटले होते. (असे वंशज कधीतरी हिंदूंच्या देवतांचा आदर करतील का ? – संपादक) कुशवाहा यांनी म्हटले होते की, हिंदु धर्मशास्त्रानुसार भगवान शिव आणि अन्य देवता यांच्या आवाहनानंतर श्री दुर्गादेवीची उत्पत्ती झाली होती. त्यामुळे भगवान शिव तिचे पिता होतात. दुसरीकडे तिला ‘महागौरी’ असेही म्हटले जाते. अशा वेळी गौरी शिवाची पत्नी होती. म्हणजे भगवान शिवाने स्वतःच्या मुलीशी विवाह केला का ?, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला होता.

आमदार कुशवाहा पुढे म्हणाले होते की, हे सर्व मनुवाद्यांचे षड्यंत्र आहे. महिषासुराची हत्या करण्यासाठी त्यांनी श्री दुर्गादेवीचा वापर केला. महिषासुराचा वध नाही, तर हत्या झाली होती. मनुवादी हे सांगतील का की, कोणत्या मैदानात दुर्गादेवीने महिषासुराशी युद्ध केले आणि रात्री कोणते युद्ध करण्यासाठी ती जात होती ?

संपादकीय भूमिका

  • स्वतःला पुरो (अधो) गामी म्हणवून घेणारे लोक विद्येची देवता असलेल्या श्री सरस्वतीदेवीवर गेली अनेक दशके टीका करत आहेत; मात्र तरीही हिंदूंच्या श्रद्धेवर कोणताही परिणाम झालेला नाही आणि होणारही नाही; कारण त्यांना देवीचे महात्म्य ठाऊक आहे !
  • हिंदूंच्या देवतांचा अशा प्रकारचा अवमान करणार्‍यांवर कारवाई होत नाही; मात्र इस्लामचा अवमान झाल्यावर लगेचच कारवाई होते किंवा त्यांचे अनुयायी थेट कायदा हातात घेऊन गुन्हेगारी कृत्य करतात ! हिंदु सहिष्णु असल्याने ते असे काही करत नाहीत !