बांदा आचे (इंडोनेशिया) – इंडोनेशियातील बंदा आचे राज्यात शेकडो लोकांनी रोहिंग्या शरणार्थींच्या तळावर आक्रमण केले. आक्रमण करणार्या जमावामध्ये बहुतांश विद्यार्थी होते. लोकांचा जमाव आपल्या दिशेने पुढे येत असल्याचे पाहून रोहिंग्या शरणार्थीं पळू लागले. पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून रोहिंग्या शरणार्थींना वाचवले. ‘राष्ट्राध्यक्ष जोको बिडोडो यांचे सरकार रोहिंग्या शरणार्थींच्या विरोधात काहीच करत नाही. या शरणार्थींमुळे इंडोनेशियातील लोक उपासमारीने मरण्याचा धोका आहेत’, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार सध्या सर्वाधिक रोहिंग्या निर्वासित मलेशिया आणि इंडोनेशिया या इस्लामी देशांमध्ये पोचत आहेत.
१. सागरी मार्गाने नौकेतून इंडोनेशियात सातत्याने घुसखोरी करणार्या रोहिंग्या मुसलमानांच्या विरोधात येथील विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन छेडले आहे.
२. ‘सरकारने रोहिंग्यांना तात्काळ त्यांच्या देशात म्हणजे म्यानमारमध्ये पाठवावे’, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
३. प्रतिवर्ष म्यानमारमधून हाकललेले रोहिंग्या शरणार्थी वेगवेगळ्या देशांमध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न करतात. गेल्या महिन्यात अनुमाने २५० रोहिंग्या इंडोनेशियातील बंदा आचे राज्यातील समुद्रकिनार्यावर लाकडी बोटीतून आले होते.
४. स्थानिक लोकांनी त्यांना परतवून लावला होते. इंडोनेशियातील बंदा आचे राज्यात रोहिंग्या मुसलमानांच्या घुसखोरीच्या विरोधात लोकांचा रोष भडकला आहे.
(सौजन्य : Republic World)
संपादकीय भूमिकाएका इस्लामी देशातील लोक त्यांचे धर्मबांधव असणार्या रोहिंग्या मुसलमानांना हाकलू लावतात; मात्र भारतात घुसखोरी करणार्या रोहिंग्यांना खोटी ओळखपत्रे देऊन त्यांना भारतात सामावून घेतले जाते, हे लज्जास्पद ! |