अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्यस्ततेमुळे दिला आहे नकार !
नवी देहली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी २६ जानेवारी २०२४ च्या भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यास नकार दिल्यानंतर भारताने फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांना आमंत्रित केले आहे. मॅक्रॉन यांनी भारताचे निमंत्रण स्वीकारल्यास फ्रान्सचे राष्ट्रपती भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची ही सहावी वेळ असेल. यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फ्रान्सच्या ‘बॅस्टिल डे परेड’मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून भाग घेतला होता. या संचलनामध्ये सहभागी होणारे ते दुसरे भारतीय पंतप्रधान होते. यात भारताच्या तिन्ही सैन्याच्या ‘मार्चिंग’ तुकडीच्या २६९ सैनिकांनी भाग घेतला होता.
२६ जानेवारीच्या काळात जो बायडेन अन्य कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्याने त्यांनी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहू शकणार नाहीत, असे कळवले आहे.