आंदोलकांची इस्लामाबादच्या दिशेने आगेकूच
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानातील बलुच नागरिकांचा नरसंहार आणि गायब होण्याच्या घटनांच्या विरोधात सहस्रो बलुची नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.
सौजन्य South Asia NewsLine
गेल्या काही दिवसांपासून हे आंदोलन चालू असून आता आंदोलन राजधानी इस्लामाबादकडे आगेकूच करत आहेत. बलुचिस्तान प्रांतातील तुर्बतपासून चालू झालेला हा मोर्चा इस्लामाबादजवळ असलेल्या ताऊन्सा शहरापर्यंत पोचला आहे. याआधी डेरा गाझी खान शहरात मोर्चा पोचला असता २० आंदोलनक बलुचींना अटक करण्यात आली होती.
ताऊन्सा येथे झालेल्या मोर्च्याच्या वेळी पख्तून राष्ट्रवादी नेते अली वझीर यांनी बलुची एकतेचे आवाहन केले. बलुचिस्तान यकजेहती समितीने म्हटले की, इस्लामाबादमध्ये पोचताच पुढील कार्ययोजना घोषित केली जाईल. राजकीय नेते मेहरांग बलोच म्हणाले की, हे आंदोलन सरकारच्या विरोधातील एकतेचा आवाज आहे. ‘पाकिस्तानी यंत्रणांनी बलुचिस्तान प्रांतातील डेरा बुगती आणि केच जिल्ह्यांतून आणखी ८ बलुची लोकांचे अपहरण करून त्यांना अज्ञात जागी नेले’, असा आरोप करण्यात येत आहे.
संपादकीय भूमिका‘भारताला हिंस्र ठरवणार्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांना पाकचा हा नरसंहार हिंस्र वाटत नाही का ?’ अशी विचारणा भारताने या संघटनांना करणे आवश्यक ! |