‘निर्विचार’ हा नामजप केल्यावर मनाला दुसरे काहीच आठवत नाही. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात’, या अध्यात्मातील सिद्धांताप्रमाणे या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते, म्हणजे प्रथम मनोलय, नंतर बुद्धीलय, त्यानंतर चित्तलय आणि शेवटी अहंलय होतो. त्यामुळे आपल्याला निर्गुण स्थितीत जाण्यासाठी साहाय्य होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘या नामजपाचा काय परिणाम होतो ?’, हे अनुभवायला सांगितले होते. १७ ते १९.६.२०२१ या कालावधीत ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संगीत विभागाच्या समन्वयक आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या संगीत विशारद सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांच्या आवाजातील ‘निर्विचार’ हा नामजप साधकांनी रामनाथी आश्रमातील ध्वनीक्षेपकावर ऐकला. या नामजपाच्या संदर्भात मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१.१७.६.२०२१ या दिवशी ‘निर्विचार’ हा नामजप ऐकतांना आलेल्या अनुभूती
१ अ. त्रासदायक अनुभूती
१. हा नामजप ऐकल्यानंतर माझी प्राणशक्ती न्यून झाली. मला चक्कर येत होती.
१ आ. चांगल्या अनुभूती
१. या दिवशी ‘निर्विचार’ हा नामजप ऐकतांना ‘मनातील विचार निघून जात आहेत’, असे मला जाणवले. नंतर माझे मन शांत झाले.
२. थोडा वेळ माझा ‘निर्विचार’ हा नामजप होत होता. त्यानंतर माझा ‘महाशून्य’ हा नामजप चालू झाला.
३. काही वेळाने मला चांगले वाटून माझे मन शांत झाले. मला त्रास देणार्या मोठ्या अनिष्ट शक्तीची शक्ती न्यून झाल्याचे जाणवले.
२.१८.६.२०२१ या दिवशी ‘निर्विचार’ हा नामजप ऐकतांना आलेल्या अनुभूती
२ अ. त्रासदायक अनुभूती
१. या दिवशी आरंभी माझ्या मनात नकारात्मक विचार आले.
२ आ. चांगल्या अनुभूती
१. नंतर ‘नामजपातून माझ्या शरिरात सर्वत्र चैतन्य प्रक्षेपित होत आहे. माझ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट झाले’, असे मला वाटले.
२. नामजपाच्या वेळी अखेरपर्यंत माझे ध्यान लागले. मला ‘निर्विचार’ हा नामजप सतत करावा’, असे वाटत होते. नंतर माझे मन शांत झाले.
३.१९.६.२०२१ या दिवशी ‘निर्विचार’ हा नामजप ऐकतांना आलेल्या अनुभूती
अ. आरंभी मनात ‘महाशून्य’ हा नामजप चालू होता. त्या वेळी माझ्या मनात भूतकाळातील विचार येत होते. ‘हे विचार अनिष्ट शक्तींच्या त्रासामुळे येत आहेत’, असे मला वाटले.
आ. ‘निर्विचार’ हा नामजप चालू झाल्यावर माझ्या मनातील भूतकाळातील विचार आपोआप नाहीसे झाले. माझे मन शांत झाले. ‘माझ्यावरील सर्व आवरण नष्ट झाले’, असे मला जाणवले.
इ. माझ्या डोळ्यांसमोर सतत परात्पर गुरु डॉ. आठवले दिसत होते.
ई. ‘मनात पोकळी निर्माण होऊन मनात कोणतेच विचार नाहीत’, असे मला अनुभवता आले. ‘मला देवाविना काहीच नको, विचारही नकोत’, असे वाटत होते.
उ. नंतर ‘नामजपाचे चैतन्य हळूहळू आत आत जात आहे. मन रिक्त झाले आहे’, असे मला जाणवले. ‘मन म्हणजे पोकळी आहे. त्यामध्ये काही नसून केवळ शांती आहे’, असे मला वाटत होते.
४.२१ ते २३.६.२०२१ या कालावधीत ध्वनीक्षेपकावर लावलेला नामजप ऐकत नामजप करतांना आलेल्या अनुभूती
अ. ध्वनीक्षेपकावर लावलेला ‘निर्विचार’ हा नामजप ऐकत नामजप करतांना माझ्या डोळ्यांसमोर परात्पर गुरु डॉक्टर आठवले दिसत होते.
आ. ‘माझ्या प्रत्येक अवयवाभोवती असलेले मनातील विचारांचे आवरण तुटत आहे’, असे मला वाटत होते.
इ. माझ्या मनातील अनावश्यक विचार न्यून होऊन मला शांत वाटत होते.
ई. ‘माझ्या डोक्यावर पोकळी निर्माण झाली आहे आणि माझ्या सहस्रारातून शरिरात चैतन्य जात आहे’, असे मला जाणवत होते.
उ. या नामजपाच्या चैतन्याने माझा आध्यात्मिक त्रास न्यून होऊन माझ्यामध्ये उत्साह निर्माण झाला.’
– सुश्री (कु.) कल्याणी गांगण (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ४३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |