Hamas : गाझामधील लोकांसाठी पाठवण्यात आलेले जीवनोपयोगी साहित्य हमासच्या आतंकवाद्यांनी लाटले !

गाझा – इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामानंतर जगभरातून गाझातील नागरिकांना साहाय्य म्हणून विविध जीवनोपयोगी साहित्य पाठवण्यात आले होते. हे साहित्य हमासच्या आतंकवाद्यांनी लाटले, अशी माहिती इस्रायलने दिली. इस्रायल सैन्य दलाने ‘एक्स’वर काही व्हिडिओ प्रसारित केले. या व्हिडिओजमध्ये हमासचे आतंकवादी नागरिकांना पुवण्यात येणारे साहाय्य साहित्य पळवून नेत असल्याचे आणि नागरिकांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. गाझामधील सामान्य नागरिकांच्या गरजा पुढे करून हमास आतंकवादी मनसुबे पूर्ण करत असल्याचाही आरोप इस्रायलने केला आहे.

हमासच्या आतंकवाद्यांची इस्रायलसमोर शरणागती !

गाझामध्ये चालू असलेल्या युद्धाच्या वेळी हमासच्या अनेक आतंकवाद्यांनी इस्रायली सैनिकांसमोर शरणागती पत्करली आहे, अशी माहिती इस्रायली सैन्य दलाचे प्रवक्ते डॅनिअल हगारी यांनी दिली. शरणागती पत्करलेल्यांकडून हमासची गुप्त माहिती इस्रायली सैन्याला मिळत आहे. हमासकडून इस्रायलच्या विरोधात कशा पद्धतीने छुपी आक्रमणे केली जातात ?, याचीही माहिती मिळवली जात आहे.