समाजातील संयम नष्ट होत असून हिंसकता वाढत असल्याचे दर्शवणारी घटना !
वाशिम – येथे एका वडिलांनीच स्वतःच्या मुलीवर चाकूने आक्रमण केल्याची घटना समोर आली आहे. यात मुलगी गंभीर घायाळ झाली असून तिच्यावर उपचार चालू आहेत. या प्रकरणी तक्रार प्रविष्ट झाल्यावर वडिलांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी मुलीचा गळा आणि पाठ यांवर चाकूने वार केले. मुलगी इयत्ता दहावीत शिकत असून तिचे प्रेम प्रकरण चालू आहे. तिला पुष्कळ समजावूनही ती ऐकत नसल्याने त्या दोघांमध्ये वाद झाला. यात त्यांनी शेवटी तिच्यावर चाकूने आक्रमण केले.