दुकान हटवण्याची भाविकांची मागणी !
छत्रपती संभाजीनगर – वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एक महादेवाची पिंड आहे. भाविक या पिंडीचे दर्शन घेतात; परंतु एका स्थानिक व्यापार्याने पिंडीच्या बाजूला अतिक्रमण करून दुकान थाटले आहे. त्यामुळे भाविकांना पिंडीचे दर्शन घेण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे ‘मंदिर विश्वस्तांनी हे दुकान हटवावे’, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे.
संपादकीय भूमिकामंदिराबाहेर अतिक्रमण होईपर्यंत मंदिर व्यवस्थापन काय करत होते ? असे अतिक्रमण हटवण्याची मागणी भाविकांना का करावी लागते ? प्रशासन भाविकांचा विचार का करत नाही कि व्यापार्याच्या लाभामध्ये प्रशासनाचाही वाटा आहे ? |