१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाढदिवसाच्या दिवशी वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्य आणि आनंद जाणवणे अन् ते अनुभवतांना मन निर्विचार आणि उत्साही होणे
‘भाद्रपद अमावास्या (२५.९.२०२२) या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्या दिवशी सकाळपासूनच वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्य आणि आनंद जाणवत होता अन् प्रकाश दिसत होता. ते अनुभवतांना माझे मन निर्विचार आणि उत्साही होते. ‘हे वातावरण आम्हा सर्व साधकांना प्रतिदिन अनुभवता येऊ दे’, अशी माझ्याकडून देवाला प्रार्थनाही होत होती. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाढदिवसानिमित्त होणार्या भावसोहळ्याला उपस्थित रहाण्याची पात्रता नसूनही मला भावसोहळ्याला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली.
२. वाढदिवसाच्या वेळी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे रूप मोठे होत जाऊन त्या न दिसणे आणि त्यानंतर साधिका पुष्कळ गतीने पोकळीतून कुठेतरी जात असल्याचे तिला जाणवणे
वाढदिवसाच्या वेळी आम्हाला वातावरणातील पालट अनुभवायला सांगितले. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ भूमीतून प्रगट होत असून त्यांचे रूप मोठे मोठे होत होते. त्यांचे ते रूप इतके मोठे झाले की, त्या दिसत नव्हत्या. त्यानंतर मी एका पोकळीतून कुठे तरी जात असून हवेत तरंगत असल्यासारखे मला जाणवत होते. माझ्या जाण्याची गती पुष्कळ होती. ‘त्या स्थितीतून बाहेर येऊ नये’, असे मला वाटत होते.
३. त्यानंतर तिन्ही गुरु, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ माझ्या डोळ्यांसमोर येऊन माझी पुष्कळ भावजागृती झाली.
४. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा संवाद चालू असतांना साधिका आसंदीत बसली असल्याचे तिला भान न रहाणे
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा संवाद चालू असतांना मी आसंदीत बसले होते. त्या वेळीही ‘मी हवेत आहे’, असेच मला वाटत होते. मधे मधे मला आसंदीत बसल्याचे भानच रहात नव्हते. ‘मी आसंदीतच आहे ना ?’, हे पहाण्यासाठी मी २ वेळा आसंदीला हात लावून पाहिला.
५. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे अस्तित्व नसून त्यांच्या ठिकाणी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेच आहेत’, असे दिसणे
‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सांगितलेले प्रत्येक सूत्र माझ्यासाठी आहे. मीदेखील असेच प्रयत्न करायला पाहिजेत’, असे वाटून माझेही चिंतन होऊ लागले. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे अस्तित्वच नसून त्यांच्या ठिकाणी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेच आहेत’, असे मला दिसत होते.
‘आम्हा सर्व साधकांना सतत आनंदी आणि भावस्थितीत रहाता यावे अन् गुरूंची सेवा तळमळीने करता यावी, असा आशीर्वाद द्यावा’, अशी परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या चरणी प्रार्थना !’
– सौ. वर्धिनी गोरल (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.९.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |