Palestine Europe : युरोपात पॅलेस्टाईन समर्थनार्थ चालू असलेली आंदोलने थांबवून ती गाझामध्ये जाऊन करा !

नेदरलँड्सचे खासदार गीर्ट विल्डर्स यांचा घणाघात

गीर्ट विल्डर्स

अ‍ॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – जर्मनीतील बर्लिन शहर असो कि संपूर्ण युरोपीय खंड, सर्वत्र पॅलेस्टाईन समर्थनार्थ निंदनीय आंदोलने चालू आहेत. अनेक वर्षांपासून असलेल्या खुल्या सीमा, तसेच डावे नि उदारमतवादी यांची ‘कल्चरल रिलेटिविझम्’ (टीप) विचासरणी यांचाच हा परिणाम होय. मला हे स्पष्ट आहे की, या लोकांपासून आपण आपली सुटका करून घ्यायला हवी. त्यांना सांगा की, त्यांना आंदोलने करायची असल्यास, त्यांनी ती हमासच्या आतंकवादाच्या विरोधात गाझामध्ये जाऊन करावीत’, असा घणाघात नेदरलँड्स येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’चे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी केला. ‘एक्स’वरून मांडलेल्या या भूमिकेच्या पोस्टला त्यांनी जर्मनीत सहस्रावधी मुसलमानांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ काढलेल्या आंदोलनाचा व्हिडिओही जोडला आहे.

टीप : ‘कल्चरल रिलेटिविझम्’ म्हणजे ‘ज्याची जशी संस्कृती आणि धर्म आहे, त्याचा त्याच्या भूमिकेत जाऊनच अभ्यास केला पाहिजे, अशी विचारसरणी ! यामध्ये अमुक धर्म अथवा संस्कृती यांच्याविषयी आपल्या दृष्टीकोनातून कोणताही निष्कर्ष काढला जाऊ नये, असे सांगितले जाते !’ पाश्‍चात्त्यांमधील काही वर्गांमध्ये रूढ झालेल्या अशा भूमिकेमुळे एखादी विचारसरणी वस्तूत: घातक आणि मानवविरोधी असली, तरी त्याला कुणी विरोध करणार नाही, असे वरील ट्वीटवरून गीर्ट विल्डर्स यांना सुचवायचे आहे.