नवी देहली – राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने ‘बहिश्ती जेवर’ या पुस्तकावर बंदी घालण्यासाठी उत्तरप्रदेशातील सहारनपूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना नोटीस पाठवली होती. यात नोटिसीमध्ये दारुल उलूम देवबंदमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या शिक्षणावर काही प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर प्रशासनाने देवबंदच्या संकेतस्थळावरून या पुस्तकातील आक्षेपार्ह भाग हटवला आहे. तसेच हे पुस्तक दारुल उलूम देवबंदच्या मदरशांमध्ये शिकवण्यास बंदी घातली आहे. या संदर्भात आयोगाने माहिती दिली आहे. या पुस्तकात प्राण्यांवर बलात्कार करणे, मृत महिला आणि अल्पवयीन मुली यांच्याशी लैंगिक संबंध ठेवणे यांचे समर्थन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अंघोळ न करण्यासही यात योग्य म्हटले होते.
१. आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी सामाजिक माध्यमांतून एक पोस्ट प्रसारित करून सांगितले की, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण कसे करण्यात यावे, असे सांगणारा मौलाना अश्रफ अली थानवी याने लिहिलेले ‘बहिश्ती जेवर’ हे पुस्तक सहारनपूर येथील देवबंदच्या मदरशांतून फतवे काढण्यासाठी वापरण्यात येत आहे. तसेच मुलांना शिकवण्यासाठीही याचा वापर केला जात आहे. यावरून प्रशासनाला नोटीस बजावण्यात आल्यानंतर सहारनपूर प्रशासनाने पुस्तकाचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. याविषयी अधिक चौकशी करण्यात येत आहे.
२. देहलीतील सामाजिक संस्था ‘मानुषी सदन’ने राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडे याविषयी तक्रार केली होती. त्यानंतर आयोगाने प्रशासनाला नोटीस बजावली होती.
संपादकीय भूमिका
|