५९ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍मलेला नागपूर येथील कु. पद्मनाभ महेश परांजपे (वय १६ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! कु. पद्मनाभ महेश परांजपे हा या पिढीतील एक आहे !

(‘वर्ष २०१८ मध्‍ये कु. पद्मनाभ महेश परांजपे याची आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के होती आणि आता वर्ष २०२३ मध्‍ये त्‍याची आध्‍यात्‍मिक पातळी ५९ टक्‍के झाली आहे.’ – संकलक)

कु. पद्मनाभ महेश परांजपे

कु. पद्मनाभ महेश परांजपे (वय १६ वर्षे) याच्‍याविषयी त्‍याच्‍या आईला जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

१. प्रेमभाव

‘कु. पद्मनाभ जिथे जाईल, तिथे सर्वांना आपलेसे करतो. तो सर्वांची विचारपूस करतो. तो इतरांना साहाय्‍य करतो. त्‍याला गोमाता अतिशय आवडते. बाहेर जातांना गायी बघितल्‍या की, त्‍याची आपोआप नमस्‍काराची मुद्रा होते.

२. वक्‍तशीरपणा 

तो कुठेही जाणार असेल, तर त्‍या वेळेतच सकाळी लवकर उठून तयार होतो.

३. प्रामाणिकपणा

त्‍याच्‍या हातून कधी कोणती चूक झाली, तर तो ती चूक प्रामाणिकपणे सांगतो. त्‍याला दिलेल्‍या पैशांचा तो व्‍यवस्‍थित हिशोब ठेवतो आणि पैसे शिल्लक राहिले असतील, तर ते मला परत करतो.

४. ऐकण्‍याची वृत्ती

त्‍याला मोठ्या माणसांनी काही सांगितले आणि त्‍याला त्‍या वेळी पटले नाही, तरीही तो ऐकून घेतो. त्‍या वेळी तो त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार करतो आणि नंतर स्‍वतःचे मतही तो व्‍यक्‍त करतो.

५. धार्मिकतेची आवड

तो संध्‍या आणि प्रार्थना करतो. तो एका गुरुजींकडे रुद्र शिकला आहे. गुरुजी त्‍याला जिथे रुद्राचे पाठ असतील, तिथे घेऊन जातात. तेव्‍हा तो न कंटाळता रुद्र खड्या आवाजात म्‍हणतो. तो ज्‍या यजमानांकडे जातो, त्‍यांनाही त्‍याचे वेगळेपण जाणवते.

६. सेवेसाठी आईला साहाय्‍य करणे

अनेकदा माझे काही सत्‍संग किंवा अन्‍य काही सेवा यांमुळे मी त्‍याला वेळ देऊ शकत नाही. त्‍याच्‍या जेवणाच्‍या वेळा पालटल्‍या, तरी त्‍याचे गार्‍हाणे नसते. त्‍याची दहावीची परीक्षा असतांना मला धर्मसभेला जायचे होते. तरीही तो मला म्‍हणाला, ‘‘तुला जायचे आहे, तर तू जा. माझी काळजी करू नको.’’

७. कु. पद्मनाभचे स्‍वभावदोष

अव्‍यवस्‍थितपणा, चालढकलपणा, आळस, वेळ वाया घालवणे, त्‍याचे स्‍वतःचे साधनेचे प्रयत्न, म्‍हणजे नामजप किंवा सेवा असे होत नाही, तो चंचल आहे.’

 – सौ. वैशाली महेश परांजपे, नागपूर (१७.३.२०२३)