हिंदूंना धर्मापासून लांब नेणारा ‘धार्मिक जिहाद !’

१. धर्मशिक्षण आणि धर्माभिमान यांच्या अभावी हिंदु समाज धर्माच्या मूळ विचारसरणीपासून भरकटणे

धर्मावरील श्रद्धा आणि अध्यात्म यांकडे हिंदूंचा कल आहे. आजही हिंदू ज्यांना पवित्र मानतात, त्यांच्यापुढे नतमस्तक होतात, या भावनेमुळे आजही त्यांच्यामध्ये माणुसकी दिसून येते. ‘प्रत्येक कणाकणात देवाचे अस्तित्व असून संपूर्ण पृथ्वी ही आपले कुटुंब आहे’, अशी हिंदूंची भावना आहे. दुर्दैवाने आज हीच भावना हिंदूंच्या विनाशाला कारणीभूत ठरते. हिंदु समाजामध्ये धर्माभिमान आणि धर्मशिक्षण यांचा अभाव आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत त्यांची विचारसरणी पालटली आहे. हिंदूंमध्ये त्यांच्या देवीदेवतांविषयी संशयाची भावना निर्माण झाली आहे. हे सर्व नियोजनबद्ध पद्धतीने केले जात आहे. हे सर्व साम्यवादी विचारसरणीचे शिक्षण आणि धर्मनिरपेक्षतेचा केला जाणारा गौरव यांमुळे झाले आहे. त्यामुळे हिंदु संभ्रमात असून तो धर्माच्या मूळ विचारसरणीपासून भरकटला आहे. त्याच्यामध्ये धर्माविषयी योग्य-अयोग्य ज्ञान नसल्याने त्याचा विवेक नगण्य झाला आहे. हिंदूंमधील शत्रूबोध जवळजवळ नाहीसा झाला आहे.

श्री. सचिन सिझारिया

२. हिंदूंना श्रीराम, श्रीकृष्ण आणि शिव अशा देवतांपासून दूर नेण्याचे षड्यंत्र !

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका दूरदर्शनवर प्रसारित झाल्यापासून लोकांमध्ये पुष्कळ उत्साह होता. काही काळानंतर भारतात अनेक वाहिन्यांचे प्रसारण चालू झाले. तेव्हापासून लोकांच्या विचारसरणीत पालट झाला. अनेक धार्मिक मालिका सिद्ध होऊ लागल्या; पण त्यात वस्तूस्थितीचा विपर्यास केला गेला. काही धार्मिक वाहिन्याही अस्तित्वात आल्या. या सर्व वाहिन्यांवर कथाकार, महाराज वगैरे येऊन प्रवचन देऊ लागले. काही वर्षांपूर्वी लोक प्रभु श्रीराम, श्रीकृष्ण आणि भगवान शिव यांना मानत असत. प्रभु श्रीरामाच्या चरित्राने ते अतिशय प्रभावित झाले होते. त्यांचा रामलीला आणि कृष्णलीला यांमध्ये उत्साही सहभाग होता. धार्मिक कार्यक्रमांविषयी त्यांच्या मनात श्रद्धाभाव होता; परंतु काळ पालटला आणि लोकांचा राम अन् श्रीकृष्ण यांच्याविषयी ओढा न्यून झाला. वाढत्या जडवादामुळे हिंदूंना देव नको; पण देवाकडून सर्व काही हवे आहे. त्यामुळे देवीदेवतांच्या पूजेमध्ये पालट दिसून आला आहे. आज हिंदू आपला हेतू पूर्ण करण्यासाठी सहजपणे इस्लाम धर्म स्वीकारतात. हिंदूंची अशी परिस्थिती सहजपणे घडलेली नाही. त्यामागे एक मोठे षड्यंत्र चालू आहे. या षड्यंत्राच्या अंतर्गत हिंदूंना त्यांच्या धर्मापासून दूर नेण्यात आले आहे. हिंदूंची शिक्षणव्यवस्था, राजकीय परिस्थिती, अर्थव्यवस्था, धार्मिक संघटना आणि धर्मगुरु, आपली संपर्कमाध्यमे, आरोग्यव्यवस्था अशा सर्व बाजूंनी हे षड्यंत्र रचले जात आहे.

३. काही आध्यात्मिक संस्थांकडून हिंदूंना धर्मापासून दूर नेण्याचा प्रयत्न

धर्माच्या नावाखाली अनेक लोक आणि संस्था हिंदूंची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. या तथाकथित संस्था एकेश्वरवाद आणि त्या संस्थांचे तथाकथित गुरु यांचे उदात्तीकरण करून हिंदूंना त्यांच्या देवता अन् त्यांचे मूळ यांपासून दूर नेत आहेत. ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु:’ या श्लोकाचा अर्थ आणि अन्वयार्थ पालटून हिंदूंना भ्रमित केले जात आहे. तथाकथित भोंदूबाबा हिंदूंना त्यांचा देव आणि गुरु मानायला भाग पाडतात. यातील बहुतेक संस्था हिंदु देवतांची पूजा करण्यास आणि परंपरांचे पालन करण्यास बंदी घालतात. ते त्यांना त्यांच्या तथाकथित गुरूंनी सांगितलेला ईश्वर आणि गुरु यांना मानण्यास भाग पाडतात. अशा बहुतांश संस्थांचे संस्थापक अहिंदू असतात.
काही संस्थांमध्ये जे उपक्रम होतात, ते ख्रिस्ती आणि मुसलमान यांसारख्या अब्राहमिक पंथांचे असतात. यात होणारी प्रवचने इत्यादींमध्ये पीर फकीर आिण येशू ख्रिस्त यांची स्तुती केली जाते. इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माशी संबंधित लोक अन् घटना यांविषयी अधिक बोलले जाते. राम-कृष्ण, शंकराचार्य आणि संत यांविषयी अल्प बोलले जाते, तसेच त्यांना हीन दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. या संस्था वेगवेगळ्या नावाने चालू आहेत; पण त्यांचा उद्देश एकच आहे. या संस्थांना विदेशातून भरपूर पैसा मिळतो. त्यामुळे त्या भारतभर पसरल्या आहेत.

४. हिंदूंचे मानसिक धर्मांतर

ज्याप्रमाणे चर्चमध्ये नन्स आणि धर्मगुरु असतात, त्याप्रमाणे त्यांच्याकडे स्वयंसेवक अन् कामगारही असतात. या स्वयंसेवकांचे त्यांच्या कुटुंबियांशी असलेले नातेही अल्प होते. स्वयंसेवकांची इच्छा नसली, तरी ते त्यांच्या संस्थेच्या कार्यात व्यस्त रहातात. ते बहुतांश गरीब हिंदु कुटुंबातील आहेत. जे असाहाय्य आणि गोंधळून गेल्यामुळे त्यांच्या जाळ्यात अडकतात. त्यांच्या प्रवचनांमध्ये सांगितले जाते की, हिंदूंचा ‘देव’, मुसलमानांचा ‘अल्ला’, ख्रिस्त्यांचा ‘देव’ एकच आहे. त्यामुळे आपण त्यांच्या देवावरही विश्वास ठेवला पाहिजे. यातील बहुतांश संस्था पीर फकीरांच्या परंपरांचे पालन करतात. तसेच त्यांना हिंदु संतांपेक्षा अधिक परिपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हिंदूंचे मानसिक धर्मांतर होऊ लागते. काही कथाकार त्यांच्या कथांमध्ये पीर फकीरांचाही समावेश करतात.

५. तथाकथित कथाकारांकडून हिंदु धर्माची केली जाणारी दिशाभूल !

अशा अनेक संस्था कार्यरत आहेत. सुशिक्षित आणि श्रीमंत हिंदूही त्याला भुलतात. हिंदूंना २-३ पिढ्यांपासून धर्माचे ज्ञान नसल्यामुळे हिंदु समाज संभ्रमात पडला आहे. आपली धार्मिक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या पोकळीचा लाभ या संघटना घेत आहेत. पैसा मिळवणे हेच सर्वस्व मानणारा हिंदूंचा एक वर्ग मानसिक तणावातून मुक्ती मिळवण्यासाठी या सगळ्यात अडकतो. या सगळ्यात अडकण्याचे एक कारण, म्हणजे धर्माचा चुकीचा अर्थ लावणार्‍या खोट्या कथाकारांची माध्यमांवरही चांगली पकड आहे. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधणे सोपे झाले आहे.

६. तथाकथित बाबांच्या प्रवचनांमधून ‘लव्ह जिहाद’ला खतपाणी !

या संस्था आणि तथाकथित बाबा यांच्या पंडालमध्ये (भव्य मंडपात) हिंदु महिला आणि मुली मोठ्या संख्येने आहेत. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून तरुण मुली गोंधळून जातात. ‘सर्व मार्ग एक आहेत’, ‘राम आणि रहीम एक आहेत’, असे जेव्हा हिंदु मुली ऐकतात, तेव्हा त्यांना अब्दुल सहजपणे त्याच्या गोड बोलण्यात अडकवतो अन् म्हणूनच त्या ‘लव्ह जिहाद’मध्ये फसतात. त्यांचे कुटुंबही त्यांना समजावून सांगू शकत नाही; कारण ते स्वतःच गोंधळून जातात. या प्रवचनांमधूनच ‘लव्ह जिहाद’ची भूमिका सिद्ध केली जाते. या संघटना हिंदूंमधील धर्माभिमान न्यून करतात आणि आपली शत्रुत्वाची भावना दूर करतात. त्यामुळे आपली प्रतिकार करण्याची क्षमता अल्प होते. त्यांच्या उपदेशांमुळे हिंदु समाज आत्मकेंद्रित आणि स्वार्थी होतो. आज हिंदूंमध्ये संवेदनशीलतेचा अभाव दिसून येतो. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला साहाय्य करण्याऐवजी लोक भ्रमणभाषवर चित्रफीत बनवण्यात व्यस्त असतात. अशा दृष्टीकोनामुळे ‘जिहाद’ सोपा होतो.

७. तथाकथित बाबा आणि गुरु यांचे  राजकारणी अन् परकीय शक्ती यांच्याशी संबंध

हे सर्व बाबा आणि तथाकथित गुरु यांचे राजकारणी अन् परकीय शक्ती यांच्याशी संबंध आहेत. हिंदु समाजाला मानसिकरित्या नियंत्रित करून षड्यंत्र रचणार्‍या शक्तींना ते साहाय्य करतात. ते त्यांच्या अनुयायांना धर्मांध आणि स्वार्थी बनवतात. त्यांना सनातनी हिंदूंपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करतात. ते आपल्या महिला आणि मुली यांना लक्ष्य करून  त्यांचे मतांतर करतात. त्यांच्या प्रवचनांमध्ये हिंदु धर्मग्रंथ आणि हिंदु संत यांच्या उपदेशाचा अभाव आहे. याविषयी चर्चा केल्यास ते त्यांच्याकडून वेगळ्या प्रकारे मांडले जाते. ते लोकांना हिंदु धर्माच्या मूलभूत शिकवणीपासून दूर नेतात आणि त्यांच्या पंथाचे अंधानुकरण करण्यावर जोर देतात. ते त्यांच्या गुरूंना मानण्यावर आणि त्यांचे तथाकथित देव ज्यांना ते ‘ईश्वर’ किंवा ‘परमात्मा म्हणतात, त्यांना मानण्यावर जोर देतात.

८. धर्म आणि ज्ञान यांच्या अभावी हिंदु समाजात विकृतींची निर्मिती

धर्म आणि ज्ञान यांच्या अभावी हिंदु समाजात अनेक विकृती निर्माण झाल्या आहेत. हिंदु समाजात परस्पर सहकार्य न्यून झाल्यामुळे विसंवादाची परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रम आणि सामाजिक दायित्व यांकडे दुर्लक्ष झाले आहे. हिंदु समाजात वाढती आर्थिक आणि सामाजिक असुरक्षितता, कुटुंबातील विघटन, तरुणांनी इतर धर्मांत लग्न करणे, वडीलधार्‍यांच्या सेवेकडे दुर्लक्ष करणे, लग्न न करणे, नातेसंबंध आणि वागण्ो यांत एकात्मता नसणे, अमली पदार्थांचे व्यसन करणे, योग्य आणि अयोग्य याची पर्वा न करणे, मौजमजा करणे, संपूर्ण समाज सुखी अन् स्वस्थ रहावा, या दृष्टीकोनाचा अभाव, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आजारी रहाणे, भोगविलासाच्या वस्तू गोळा करणे, दुसर्‍याच्या दु:खावर मौन बाळगणे, सृजनशीलतेचा अभाव इत्यादी दोषांमुळे किंकर्तव्यमूढता निर्माण होते. त्यातूनच दिशाभूल केली जाते.

९. हिंदूंनी सतर्क राहून योग्य पावले उचलणे आवश्यक !

हिंदू आता कर्मसिद्धांताकडे दुर्लक्ष करून ते अशा बाबांच्या शोधात आहेत, जे त्यांचे नशीब स्वतःवर घेऊ शकतात आणि काहीही न करता त्यांना सर्व दुःखांतून मुक्त करू शकतात. तसेच त्यांच्यासाठी आनंदाचे भांडार उघडू शकतात. त्यामुळे मानसिक तणावासारख्या समस्या निर्माण होऊ लागतात. मानसिक तणावातून सुटण्यासाठी हिंदू आता अशा बाबांच्या शिबिरांना जातात. ते मोक्ष मिळवून देण्याच्या बहाण्याने त्यांच्या जाळ्यात अडकतात. बाबांच्या या व्यवसायातून त्यांना पैसेही मिळू लागले आहेत. त्यांचा प्रभाव महानगरांपासून गावांपर्यंत आहे. दायित्वांपासून पळ काढत पलायनवादी विचारसरणीमुळे मोक्ष मिळवण्याचा लोभही या संस्थांच्या कारस्थानाला बळ देतो. आज हिंदु समाज मोठ्या संकटातून जात आहे. आपला घात करणार्‍या अशांपासून आपण सतर्क राहून योग्य पावले उचलण्याची आवश्यकता आहे.’

– श्री. सचिन सिझारिया, पुणे. (८.८.२०२३)