नांदेड रुग्‍णालयातील रुग्‍णांच्‍या मृत्‍यूची चौकशी करण्‍यात येणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

मुंबई – नांदेड रुग्‍णालयातील घटना सरकारनेच गांभीर्याने घेतली आहे. याविषयीची चौकशी करण्‍यात येणार आहे. चौकशीनंतर योग्‍य ती कारवाई करण्‍यात येईल, असे आश्‍वासन मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. नांदेड रुग्‍णालयात मागील २४ घंट्यांमध्‍ये २४ जणांचा मृत्‍यू झाल्‍याचे उघड झाले. याविषयी एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळाच्‍या बैठकीतही चर्चा केली. राज्‍याच्‍या सचिवांनी दिलेल्‍या माहितीनुसार या रुग्‍णालयात औषधांची कोणतीही कमतरता नव्‍हती. औषधांसाठी १२ कोटी रुपये संमत करण्‍यात आले होते. काही वृद्धांना हृदयविकाराचा त्रास होत होता. मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दुर्घटनेच्‍या ठिकाणी जाऊन माहिती घेतली आहे. या प्रकरणी केंद्रशासनाकडूनही अहवाल मागवण्‍यात आला आहे.