लंडन (ब्रिटन) – येथील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर पुन्हा एकदा खलिस्तान्यांनी निदर्शने केली. या निदर्शनांविषयी पोलिसांना आधीच माहिती होती, त्यामुळे त्यांनी उच्चायुक्तालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. पोलिसांनी खलिस्तान्यांना भारतीय उच्चायुक्तालयापासून दूर रोखले. या वेळी खलिस्तान्यांनी भारताविरुद्ध घोषणाबाजी केली.
UK: लंदन में भारतीय उच्चायोग के बाहर खालिस्तानी समर्थकों का दुस्साहस, प्रदर्शन के बीच ब्रिटिश सुरक्षा बल तैनात#UK #London #Khalistan https://t.co/A2VfxwwWqj
— Amar Ujala (@AmarUjalaNews) October 2, 2023
यापूर्वी झालेल्या निदर्शनांच्या वेळी खलिस्तान्यांनी इमारतीवर असलेला भारतीय राष्ट्रध्वज काढून टाकत त्याचा अवमान केला होता. या घटनेचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा करत आहे.