‘साधना करतांना नातेवाइकांशी संबंध ठेवणे अथवा न ठेवणे’, यांसंदर्भात एका साधकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विचारलेला प्रश्‍न आणि त्यांनी त्यावर दिलेले उत्तर !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

एका साधकाचा प्रश्‍न : माझ्या वडिलांचे नातेवाइकांशी चांगले संबंध आहेत. ते नातेवाइकांच्या जीवनातील चांगल्या किंवा वाईट प्रसंगात आवर्जून उपस्थित असतात. त्यामुळे वडिलांची सर्व नातेवाइकांशी जवळीक चांगली आहे; परंतु मला नातेवाइकांशी संपर्क ठेवण्याची इच्छा होत नाही. ‘केवळ साधना करून आध्यात्मिक प्रगती साध्य करावी’, असे वाटते. माझ्या साधनेच्या दृष्टीने योग्य विचार कसा असायला हवा ?

परात्पर गुरु (डॉ. आठवले) : वडिलांची प्रकृती ‘प्रवृत्तीमार्गी’ आहे. त्यामुळे त्यांची साधना नातेवाइकांच्या संपर्कात राहूनही होत आहे. तुझी प्रकृती ‘निवृत्तीमार्गी’ आहे.  त्यामुळे तुझ्या मनात येत असलेले विचार योग्य आहेत.

– एक साधक