कॅनडाचे विरोधी पक्षनेते पिएरे पोलिवरे यांचा हिंदूंना पाठिंबा !
ओटावा (कॅनडा) – कॅनडाच्या प्रत्येक नागरिकाला कोणत्याही भीतीविना देशात रहाण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक समुदायाचे या देशात स्वागत आहे. आम्ही हिंदूंविरुद्ध आक्षेपार्ह विधाने नुकतीच ऐकली असून त्यांस आम्ही विरोध करतो. हिंदूंनी देशातील प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. कॅनडामध्ये हिंदूंंचे नेहमीच स्वागत आहे, अशा शब्दांत कॅनडाचे विरोधी पक्षनेते पिएरे पोलिवरे यांनी एका सामाजिक माध्यमांतील पोस्टद्वारे हिंदूंना पाठिंबा दिला. यापूर्वी खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने कॅनडातील हिंदूंना देश सोडून जाण्याची धमकी दिल होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिवरे यांनी हे विधान केले आहे. पोलिवरे यांनी यापूर्वी खलिस्तानी आतंकवादी निज्जर याच्या हत्येचा भारतावर आरोप करतांना कोणताही पुरावा सादर न केल्यावरून ट्रुडो यांच्यावर टीका केली होती.