धावत्या रेल्वेत महिला पोलीस हवालदारावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथे ३० ऑगस्ट या दिवशी धावत्या रेल्वेगाडीमध्ये महिला पोलीस हवालदारावर आक्रमण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणार्या ३ आरोपींपैकी एकाला पोलिसांनी चकमकीत ठार केले, तर २ जणांना अटक करण्यात आली. या चकमकीत १ पोलीस उपनिरीक्षक आणि २ शिपाई घायाळ झाले. अयोध्येतील पुराकलंदरच्या छतरिवा पारा कॉल रस्ता आणि इनायतनगर येथे २ चकमकीत ही कारवाई करण्यात आली. आक्रमणामध्ये घायाळ झालेल्या महिला पोलीस शिपायावर अद्यापही रुग्णालयात उपचार चालू आहेत.
Saryu Express assault: Woman constable’s ‘attacker’ gunned down in encounter, 2 ‘associates’ arrestedhttps://t.co/dBvikapRyq
— The Indian Express (@IndianExpress) September 22, 2023
पुराकलंदर परिसरात पोलिसांनी आरोपींना घेरले होते. आरोपींना शरण येण्यास सांगण्यात आले; मात्र त्यांनी गोळीबार चालू केला. या वेळी २ आरोपी घायाळ झाले, तर दुसरा पसार झाला. पसार झालेला अनिश इनायतनगरमध्ये लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने पोलिसांवर गोळीबार केला. या वेळी पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल गोळीबारात तो ठार झाला.