१. सूक्ष्मातून दिसलेले दृश्य
१ अ. ‘दत्तमाला मंत्रा’चे पठण करतांना सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाचा रथ आश्रमात येतांना दिसणे : ‘३०.४.२०२३ या दिवशी मी आश्रमात योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी करायला सांगितलेल्या ‘दत्तमाला मंत्रा’चे पठण करत होते. मंत्राच्या पठणाची २ आवर्तने पूर्ण झाली आणि तेथील प्रवेशद्वाराच्या लोखंडी दाराचा आवाज आला. मी पठण करतांनाच बाहेर पाहिले, तर मला पुढील द़ृश्य दिसले, ‘मला सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाचा रथ दिसला. रथ आश्रमाच्या प्रवेशद्वारातून आत येत होता.
१ आ. साधिकेने गुरुदेवांसमोर हात जोडून उभे रहाणे, त्यांनी प्रेमानेे आणि कौतुकाने हसल्यावर तिला पुष्कळ आनंद होऊन पठण होईपर्यंत तिची भावावस्था टिकून रहाणे : रथ स्वागतकक्षापर्यंत आला. तेव्हा ‘मी ४ – ५ वर्षांची मुलगी झाले आहे’, असे मला वाटत होते. गुरुदेवांचे व्यवस्थित दर्शन घेता यावे; म्हणून मी स्वागतकक्षातून बाहेरच्या बाजूला पळत गेले आणि प.पू. गुरुमाऊलींच्या समोर हात जोडून उभी राहिले. तेव्हा गुरुदेवही माझ्याकडे पाहून प्रेमानेे आणि कौतुकाने हसत होते. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला आणि मीही त्यांच्यासमवेत हसू लागले.’
‘दत्तमाला मंत्रा’चे पठण पूर्ण होईपर्यंत माझी ही भावावस्था आणि आनंदावस्था टिकून राहिली अन् ‘पठण केव्हा संपले’, हेही माझ्या लक्षात आले नाही.
२. सहसाधिकेलाही अशीच अनुभूती आल्याचे कळल्यावर आनंद होणे आणि ४ दिवस अधूनमधून तेच दृश्य दिसून भावजागृती होणे
पठण झाल्यावर मी सहसाधिकेला मला आलेली अनुभूती सांगितली. तेव्हा ती साधिका मला म्हणाली, ‘‘मलाही आता अशीच अनुभूती आली.’’ आम्हा दोघींनाही पुष्कळ आनंद झाला. विशेष म्हणजे पुढे ४ दिवस झाले, तरी ते दृश्य मला अधूनमधून दिसत होते आणि माझी भावजागृती होत होती.’
२ अ. प्रश्न : एकाच वेळी दोन साधिकांना तीच आणि तशीच अनुभूती आली. यामागचे कारण काय ?
संकलक (सौ. सुजाता कुलकर्णी) : याच कालावधीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी (जन्मोत्सवासाठी) दिव्य रथ बनवण्याची प्रक्रिया चालू होती. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मोत्सवाच्या दिवशी, म्हणजे ११.५.२०२३ या दिवशी या दिव्य रथातून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांंनी साधकांना दर्शन देण्याचे नियोजनही चालू होते. एखादी प्रक्रिया स्थुलातून घडण्यापूर्वी ती सूक्ष्मातून घडलेली असते. याचीच अनुभूती येऊन एकाच वेळी २ साधिकांना एकच दृश्य दिसले.
– सौ. अनुपमा जोशी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ७० वर्षे) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.५.२०२३)
|