उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. रिशिव मांडे ही या पिढीतील एक आहे !
भाद्रपद शुक्ल पंचमी (२०.९.२०२३) या दिवशी चि. रिशिव भूषण मांडे याचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आजी श्रीमती पारुल मांडे (वडिलांची आई) आणि आई सौ. श्वेता मांडे यांना त्याच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
चि. रिशिव भूषण मांडे याला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. वय ४ मास : ‘चि. रिशिवला ‘सनातन पंचांग’ पाहून पुष्कळ आनंद व्हायचा. तो श्रीकृष्णाच्या चित्राकडे एकटक पहातो. तो रडत असतांना मी ‘शिव’ असा नामजप केला किंवा ‘जय गुरुदेव’, असे म्हटले की, त्याचे रडणे थांबायचे.
२. वय ५ मास : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ हातात दिल्यावर तो त्यावर डोके टेकवायचा. सनातनचा कुठलाही ग्रंथ रिशिवच्या पुढे ठेवला की, त्याला पुष्कळ आनंद व्हायचा.
३. वय ६ मास
अ. ‘अन्नप्राशन संस्कार विधी’ (बाळाला प्रथम अन्न भरवण्याचा विधी) चालू असतांना रिशिव मंत्रोच्चार करणार्या गुरुजींकडे एकटक पहात होता. ‘जणूकाही गुरुजी म्हणत असलेले मंत्र त्याला कळत आहेत’, असे मला वाटत होते.
आ. ‘जीविका परीक्षा विधी’च्या (टीप) वेळी शास्त्रानुसार त्याच्या पुढे शस्त्र, वस्त्र, पुस्तक, भ्रमणसंगणक (लॅपटॉप), बासरी इत्यादी वस्तू ठेवल्या होत्या. तेव्हा रिशिवच्या अगदी समोर भ्रमणसंगणक होता; परंतु त्याला हात न लावता रिशिवने डावीकडे ठेवलेल्या श्रीमद़्भगवद़्गीतेवर हात ठेवला आणि दुसर्या हाताने ती उचलण्याचा प्रयत्न केला.
टीप – ‘जीविका परीक्षा’ या विधीच्या वेळी बाळाच्या भोवती काही वस्तू ठेवतात. त्या वस्तूंपैकी बाळ ज्या वस्तूकडे वळेल किंवा ज्या वस्तूला हात लावेल, त्या वस्तूवरून ‘बाळाच्या आयुष्याचा कल कुठे असेल ?’, हे कळते.’
– श्रीमती पारुल मांडे (चि. रिशिवची आजी), कर्णावती, गुजरात.
४. वय ७ मास : ‘एकदा रिशिवच्या समोर २ ग्रंथ होते. त्यांत सनातनचा ‘श्रीरामरक्षास्तोत्र’ हा लघुग्रंथ होता. तेव्हा त्याने ‘श्रीरामरक्षास्तोत्र’ हा लघुग्रंथ उचलला आणि त्याची पाने उघडून तो लघुग्रंथ पहायला लागला.’
– सौ. श्वेता मांडे (चि. रिशिवची आई), कर्णावती, गुजरात.
५. आठवा मास : ‘मला नामजप करतांना पाहून तो जपमाळ धरून माझ्या मांडीवर शांत बसतो.’
– श्रीमती पारुल मांडे (१.९.२०२३)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |