१. सनातनच्या सद़्गुरु कै. (सौ.) आशालता सखदेव यांना नमस्कार करतांना समष्टी कार्याशी संबंधित दृश्ये डोळ्यांसमोर येणे
‘नारळी पौर्णिमा, ३१.८.२०२३ या दिवशी सनातन संस्थेच्या सद़्गुरु कै. (सौ.) आशालता सखदेव यांची सातवी पुण्यतिथी होती. सकाळी ९.५० वाजता मी त्यांच्या चरणी नमस्कार करण्यासाठी त्यांचा चेहरा समोर आणू लागले. तेव्हा काही केल्या त्यांचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येत नव्हता. त्याऐवजी हिंदु धर्मजागृती सभा, अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन, नामजप करणारे साधक, यज्ञयाग, ग्रंथप्रदर्शन, आश्रमात सेवा करणारे साधक अशी विविध समष्टी कार्याशी संबंधित दृश्ये माझ्या डोळ्यांसमोर येऊ लागली.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे रूप दिसून त्यांच्या जागी सद़्गुरु आईचा चेहरा दिसणे आणि पुन्हा समष्टी कार्याशी संबंधित दृश्ये दिसणे
आणखी काही सेकंदांनंतर मधूनच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे रूप माझ्या डोळ्यांसमोर येऊ लागले. त्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चेहर्याच्या जागी सद़्गुरु आईचा चेहरा दिसला. तो काही क्षणच दिसला. नंतर पुन्हा समष्टी कार्याशी संबंधित दृश्ये दिसू लागली.
३. त्यानंतर माझे मन पुष्कळ शांत होऊन माझा ‘ॐ’ हा नामजप सुरू झाला. नंतर बराच वेळ तोच नामजप होत होता.
४. आजवर सद़्गुरु आईचे स्मरण केल्यानंतर प.पू. डॉक्टरांचा चेहरा समोर येणे आणि यावर्षी प.पू. डॉक्टरांचे निर्गुण रूप असलेले सनातनचे कार्य डोळ्यांसमोर येणे
सद़्गुरु आईच्या देहत्यागानंतर पहिल्या वर्षी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी तिला नमस्कार करतांना मला एखादा सेकंद तिचा चेहरा दिसून नंतर तो फिकट होत जाऊन त्या जागी प.पू. डॉक्टरांचा चेहरा दिसला होता. त्यानंतर प्रत्येक वेळी तिचे स्मरण केल्यानंतर प.पू. डॉक्टरांचाच चेहरा समोर येत असे. आता यावर्षी प.पू. डॉक्टरांचे निर्गुण रूप असलेले सनातनचे कार्य डोळ्यांसमोर आले.
५. यातून ‘गुरु त्यांच्या शिष्याला त्यांच्याप्रमाणे कसे घडवतात आणि इतरांना त्यांच्या (गुरूंच्या) निर्गुण तत्त्वाची अनुभूती कशी देतात ?’, हे शिकायला मिळाले.
६. कृतज्ञता
हे सर्व शिकवणार्या प.पू. डॉक्टरांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता ! त्यांनीच आम्हा सर्व साधकांकडून त्यांना अपेक्षित अशी साधना करवून घ्यावी, ही त्यांच्या चरणी आर्तभावाने प्रार्थना !’
– सुश्री (कु.) राजश्री सखदेव (सद़्गुरु कै. (सौ.) आशालता सखदेव यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |