नाले बांधण्यासाठी सोलापूर महापालिकेला ९७ कोटी रुपये संमत !

सोलापूर – शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी खुले असलेले नाले नव्याने बांधण्यासाठी शासनाने महापालिकेला ९७ कोटी २२ लाख रुपये संमत केले आहेत. शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत १५० कोटी ९७ लाख रुपये निधी मिळावा यासाठी महापालिका आयुक्त शीतल तेली यांनी प्रस्ताव पाठवला होता. २ टप्प्यांत हे काम होणार असून पहिल्या टप्प्यातील कामासाठी शासनाने निधी संमत केला आहे. या निधीतून जुना पुणे नाका, भाग्यनगर रस्ता, शरदचंद्र प्रशाला, उमानगरी, अक्कलकोट रस्ता यांसह अन्य ठिकाणी नाले बांधण्यात येणार आहेत.