नवी देहली – अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने भारताच्या ‘चंद्रयान-३’चे ते चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले आहे, त्याचे छायाचित्र प्रसारित केले आहे.
नासाने म्हटले आहे की, ‘चंद्रयान-३’ चंद्राच्या पृष्ठभागावर २३ ऑगस्ट २०२३ या दिवशी उतरले होते. ते ठिकाण चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून ६०० किमी अंतरावर आहे. आमच्या ‘लूनर रीकॉन्सेंस ऑर्बिरटर’मध्ये लावण्यात आलेल्या ‘एल्.आर्.ओ.’ कॅमेर्याने ‘चंद्रयान-३’ उतरलेल्या भागाचे छायाचित्र काढले आहे. हे छायाचित्र ‘चंद्रयान-३’ चंद्रावर उतरल्यानंतर ४ दिवसानंतर टिपण्यात आले आहे. या छायाचित्रात ‘विक्रम’ लँडर ज्या ठिकाणी उतरले, तेथे चारही बाजूला पांढरा रंग दिसत आहे. लँडरच्या इंजिनमुळे धूळ उडाली आहे.
सौजन्य : Hindustan Times