५.९.२०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘पू. (कु.) दीपाली मतकर यांच्या संतसन्मान सोहळ्यातील सूत्रे’ पाहिली. आजच्या भागात आपण पू. दीपालीताईंच्या संत-सन्मान सोहळ्याच्या वेळी साधकांनी सांगितलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पाहूया.
(भाग ४)
पू. (कु.) दीपाली मतकर यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !सर्वांनी झोकून देऊन आणि संघभावाने साधनेचे प्रयत्न करूया ! सद़्गुरु स्वातीताई (सद़्गुरु स्वाती खाडये), आम्हाला तुमचा आनंददायी सत्संग मिळतोे आणि त्यातूनच सर्व सेवा करण्याचे बळही मिळते. (साधकांना उद्देशून) आपण झोकून देऊन साधनेचे प्रयत्न करूया. आपल्याला अशक्य असे काहीच नाही; कारण गुरुदेव आपल्या पाठीशी आहेत. सद़्गुरु स्वातीताई, ‘सगळ्यांनी झोकून देऊन आणि संघभावाने प्रयत्न करूया’, एवढेच मला वाटते. |
९ आ. पू. (कु.) दीपाली मतकर यांच्या समवेत सेवा करणार्या काही साधकांनी सांगितलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये
९ आ ४. श्री. राजन बुणगे (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६६ वर्षे), सोलापूर
९ आ ४ अ. पू. दीपालीताई कोणत्याही समस्येवर उपाय सांगत असल्याने मन शांत होऊन त्यांचा आधार वाटणे : ‘मागील ६ वर्षांपासून मी पू. दीपालीताईंच्या संपर्कात आहे. मध्यंतरी मी १० – ११ मास घरी होतो. तेव्हा ‘मला त्यांचा किती आधार वाटतो !’, हे माझ्या लक्षात आले आणि मला त्यांना भेटण्याची ओढ लागली. मी पू. दीपालीताईंकडे कधी कुठलीही समस्या घेऊन गेलो, तरी मला त्यावर उपाय मिळतो. त्यामुळे माझे मन शांत होऊन मला त्यांचा आधार वाटतो.
९ आ ४ आ. साधकांमध्ये संघभाव वाढवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणे : मध्यंतरी उत्तरदायी साधकांनी ‘सोलापूर जिल्ह्यातील साधकांनी संघभाव वाढवायला हवा’, असे सांगितले होते. पू. दीपालीताईंनाच त्याची तळमळ लागली होती. साधक एकमेकांना भेटत राहिले, तर त्यांची मने जुळतील; म्हणून त्या आम्हा साधकांना एकत्र बोलावून आमच्यातील संघभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच देवाची कृपा झाली आणि आमची मने जुळायला आरंभ झाला.
९ आ ४ इ. साधकांना चुका सांगतांना त्यांवरील उपाययोजनाही तळमळीने सांगणे : साधकांकडून साधना करतांना चुका झाल्या, तरी ‘साधकांना सांभाळून कसे घ्यायचे ?’, हे मला पू. दीपालीताईंकडूनच अनुभवता आणि शिकता आले. एका शुद्धीसत्संगात मी माझी एक चूक सांगितली होती. तेव्हा त्यांनी ‘माझ्याकडून तशी चूक पुन्हा होऊ नये’, यासाठी मला एवढ्या तळमळीने उपाय सांगितला की, त्यांचे ते शब्द अजूनही माझ्या कानांमध्ये घुमतात आणि चूक होण्यापूर्वीच ते शब्द आठवून माझ्याकडून योग्य कृती केली जाते.
९ आ ४ ई. साधकाचे स्वभावदोष हेरून ते दूर करण्यासाठी योग्य दृष्टीकोन देणे : पू. दीपालीताईंनी माझे स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू अचूक हेरले आहेत. जेव्हा त्या मला त्याविषयी सांगतात, तेव्हा मला ‘त्यांच्या माध्यमातून प.पू. गुरुदेवांचे तत्त्व कसे कार्य करते ?’, हे नेहमीच अनुभवता येतेे. त्या माझे स्वभावदोष आणि चुका सांगत असूनही ‘मला योग्य दिशा मिळणार आहे’, याची निश्चिती वाटत असल्यामुळे मला त्यांच्याशी बोलतांना आनंद वाटतो.
‘गुरुमाऊलींनी आम्हाला असे संतरत्न दिले आणि त्यांचा सहवास देऊन पुष्कळ शिकवले’, हे आम्हा सर्वच साधकांचे पुष्कळ मोठे भाग्य आहे’, त्याबद्दल मला गुरुचरणी पुष्कळ कृतज्ञता वाटते.’
९ आ ५. अधिवक्ता नीलेश सांगोलकर (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६३ टक्के)
९ आ ५ अ. ‘कु. दीपाली मतकर संतपदी विराजमान झाल्या’, ही आनंदवार्ता ऐकून गुरुमाऊलींच्या कृपेने सुचलेले काव्य :
आमची दीपालीताई संतपदी विराजमान झाली । गोपीभावाने तृप्त केले दीपालीताईने कृष्णरूपी गुरुरायांना । त्यामुळे संत सन्मान सोहळ्याचा क्षण तो अवतरित झाला ॥ १ ॥सद़्गुरुमाऊली (टीप १) आली साधकांच्या उद्धाराला । दीपालीताईला संतपदी विराजमान करून आनंदी केले सर्वांना ॥ २ ॥ आमची दीपालीताई संतपदी विराजमान झाली । प्रार्थना करतांनाचे तिचे छायाचित्र पाहूनी । पू. दीपालीताईचे बोलणे मधुर, हसणे मधुर । भगवंताच्या कृपेने लाभला सत्संग संत (टीप २) आणि सद़्गुरुमाऊली यांचा । सद़्गुरु आणि संत यांची करता येवो मज नित्य चरणसेवा । टीप १ – सद़्गुरु स्वाती खाडये टीप २ – पू. (कु.) दीपाली मतकर टीप ३ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
९ आ ५ आ. ‘श्रीकृष्णाची मीरा पू. (कु.) दीपाली मतकर यांच्या रूपाने आली असून ती कृष्णाच्या मुकुटातील मोरपीस आहे’, असे वाटणे : पू. दीपालीताईंमधील ‘गोपीभाव’ संत मीराबाईंप्रमाणे आहे. ‘भगवान श्रीकृष्णाची मीरा आज पू. दीपालीताईंच्या रूपाने आम्हाला लाभली आहे’, असे मला वाटले. त्या वेळी ‘भगवान श्रीकृष्णाच्या बासरीचा नाद संपूर्ण पृथ्वीवर घुमू लागला’, असे मला जाणवले. कित्येक वेळा मला ‘पू. दीपालीताई भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटामधील मोरपीस आहेत’, असे वाटते. आज देवाने ते मोरपीसच आम्हाला संतरूपाने दिले आहे.’
९ आ ६. श्रीमती वीणा साखरे
(वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५६ वर्षे), सोलापूर
९ आ ६ अ. कुठलीही सेवा स्वतः करून साधकांना कृतीतून शिकवणे : ‘सेवाकेंद्राची स्वच्छता किंवा सेवाकेंद्रात बाहेरून येणार्या साधकांचे नियोजन, अशी कुठलीही सेवा असू दे, ती करायला पू. दीपालीताई स्वतः आरंभ करतात. त्यांनी त्यांच्या कृतीतूनच आम्हाला सर्व शिकवलेे आहे; मात्र आम्हीच त्यांच्याकडून शिकायला न्यून पडत आहोत.
९ आ ६ आ. प्रीती : पू. दीपालीताईंची केवळ साधकांवरच नाही, तर साधकांच्या कुटुंबातील सर्वांवरच पुष्कळ प्रीती आहे. आम्ही त्यांची प्रीती विसरूच शकत नाही.’
९ आ ७. सौ. उल्का जठार (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६५ टक्के)
९ आ ७ अ. ‘सर्व साधकांची साधना होऊन साधक गुरुचरणी लीन व्हावेत’, असा ध्यास घेऊन त्या दृष्टीने सतत प्रयत्नरत असलेल्या पू. दीपालीताई ! : ‘पू. दीपालीताईंची ‘सर्व साधकांची सेवा आणि साधना व्हावी’, अशी पुष्कळ तळमळ आहे. ‘सर्व साधकांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी लीन करायचे आहे’, हाच विचार सातत्याने त्यांच्या मनात असतो. त्यांना त्याचा ध्यासच लागला आहे. त्यासाठी त्यांचे साधकांच्या साधनेकडे बारकाईने लक्ष असते. त्यांना रुग्णाईत, वयस्कर किंवा बालसाधक यांच्याही साधनेचे नियोजन करायची तळमळ असते. ‘सर्वांचा उद्धार व्हायला पाहिजे’, असे वाटत असल्यामुळे त्या मला सतत म्हणतात, ‘‘काकू, आपले सगळे साधक परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कधी जातील ? आपण प्रयत्न आणखीन कसे करूया ?’’
९ आ ७ आ. रुग्णाईत किंवा त्रास होत असलेल्या साधकांची विचारपूस करून त्यांना त्वरित नामजपादी उपाय सांगणे : माझी प्रकृती बरी नसतांना किंवा कुणी साधक रुग्णाईत असतांना पू. दीपालीताई त्यांना लगेच नामजपादी उपाय सांगतात. माझे त्यांच्याशी कधी भ्रमणभाषवर बोलणे होते. तेव्हा त्या मला विचारतात, ‘‘काकू, तुमचे नामजपादी उपाय झाले का ? त्रास न्यून झाला का ? तुम्ही उपाय वाढवा.’’ त्यामुळे माझ्या मनात काही नकारात्मकता असेल, तर ती निघून जाऊन ‘नामजपादी उपाय करायला हवेत’, असे मला वाटू लागते. जिल्ह्यात कुणी साधक रुग्णाईत असल्याचे समजल्यावर त्या लगेच ‘काकू, त्यांना होणारे त्रास लिहून पाठवायला सांगता का ?’, असे विचारतात. साधकांना नामजपादी उपाय पाठवल्यावर ‘साधक ते उपाय करतात ना ?’, याचाही त्या आढावा घेतात.
९ आ ७ इ. पू. दीपालीताई ‘गुरुकीर्तन’ सत्संग घेत असतांना जाणवलेली सूत्रे !
९ आ ७ इ १. ‘सत्संगात परात्पर गुरु डॉक्टरांची सूक्ष्मातून भेट होते’, असे साधकांना अनुभवता येणे : जिल्ह्यात प्रतिदिन सकाळी १० वाजता ‘गुरुकीर्तन’ सत्संग होता. त्या सत्संगात अनेक साधक सहभागी होतात. प्रतिदिन सकाळी ‘सत्संग कधी चालू होईल ?’, याची सर्व साधकांना उत्सुकता लागलेली असते. ‘त्या सत्संगात परात्पर गुरु डॉक्टरांची भेट होते’, असे सर्वांनाच वाटते.
९ आ ७ इ २. सत्संगामुळे साधकांना साधना आणि सेवा करण्याची प्रेरणा मिळणे : त्या सत्संगातून पू. दीपालीताई सर्वांना साधनेसाठी चांगली दिशा देतात. त्यामुळे मलाही साधना करण्याची प्रेरणा मिळते. या सत्संगामुळे सर्व साधक उत्साही होतात आणि त्यांच्या सेवेचा कालावधी वाढतो.’
९ इ. सद़्गुरु स्वाती खाडये यांनी पू. (कु.) दीपाली मतकर यांचे सांगितलेले वैशिष्ट्यपूर्ण गुण !
९ इ १. कोणतीही सेवा करण्याची सिद्धता असणे : ‘पू. दीपालीताई गुणांची खाण आहेत. ‘पू. दीपालीताईंना कधीही कुठलीही सेवा सांगितली, तरी ती पूर्ण होणार’, याची मला पूर्ण निश्चिती असते. त्यांनी कुठलीही सेवा करायला कधीही ‘नाही’ म्हटले नाही. त्यांच्याविषयी सांगायला शब्द अपुरे आहेत.
९ इ २. पू. दीपालीताईंना ‘साधकांची साधना व्हायला पाहिजे आणि त्यांची प्रगती व्हायला पाहिजे’, हा ध्यास आहे. त्या ‘साधकांची साधना व्हावी’, यासाठी अखंड प्रयत्नरत असतात.
आज पू. दीपालीताईंच्या माध्यमातून परम पूज्यांनी आपल्याला जे ‘संतरत्न’ दिले आहे, त्याचा आपण सर्वांनीच लाभ करून घेऊया. त्या सांगतील त्याप्रमाणे प्रयत्न करून आपली साधना लवकरात लवकर होऊन आपण सगळ्यांनी साधनेत पुढ जाण्याचा प्रयत्न करूया.’ (समाप्त)
(२१.४.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |