फ्रान्समध्ये ‘अबाया’ घालून आलेल्या मुसलमान विद्यार्थिनींना माघारी पाठवले !

(अबाया म्हणजे चेहरा सोडून संपूर्ण शरीर झाकणारे वस्त्र)

पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्समधील सरकारी शाळांमध्ये मुसलमान विद्यार्थिनींना ‘अबाया’ परिधान करून येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अशा वेळी शाळेच्या पहिल्याच दिवशी अबाया परिधान करून शाळेत आलेल्या मुसलमान विद्यार्थिनींना ते पालटण्यास सांगण्यात आले; मात्र या विद्यार्थिनींनी तसे करण्यास नकार दिला.

अनुमाने ३०० हून अधिक मुसलमान विद्यार्थिनी अबाया परिधान करून शाळेत आल्या होत्या. त्यांतील ६७ विद्यार्थिनींनी अबाया काढण्यास नकार दिला. त्यांना घरी पाठवण्यात आले. याविषयी शिक्षणमंत्री गॅब्रियल यांनी दुजोरा दिला आहे.