उत्तरप्रदेशात ८ ठिकाणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या धाडी

नक्षलवाद्यांना निधी पुरवल्याचे प्रकरण !

डॉ. रामनाथ चौहान यांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्त

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – नक्षलवाद्यांना निधी पुरवल्याच्या प्रकरणी ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’ने (‘एन्.आय.ए.’ने) ८ विविध ठिकाणी धाडी घातल्या. ‘एन्.आय.ए.’कडून आझमगड, देवरिया, वाराणसी, प्रयागराज आणि चंदोली येथे शोधमोहीम चालू आहे.

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने मंगळवारी वाराणसीच्या महामानपुरी कॉलनीतील एका घरावर धाड घातली. ‘एन्.आय.ए.’चे पथक घरात उपस्थित असलेल्या एका विद्यार्थी संघटनेच्या दोन मुलींचे अन्वेषण करत आहे. या पथकाने देवरिया शहरातील उमानगर भागातही धाड घातली. जनवादी क्रांती दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. रामनाथ चौहान यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

कठोर शिक्षा होण्याच्या भीतीअभावीच गुन्हेगार असे देशविरोधी करू धजावतात, हे सरकारी यंत्रणांना कधी कळणार ?