सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून नोंद घेऊन कारवाई करावी !

उदयनिधी यांच्या विधानावरून माजी न्यायाधीश, सरकारी अधिकारी आदी २६२ जणांची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी

उदयनिधी स्टॅलिन

नवी देहली – देशातील माजी न्यायाधीश, निवृत्त सरकारी अधिकारी, सैन्याधिकारी आदी २६२ जणांनी सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहिले आहे. त्यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माला संपवण्याविषयीच्या विधानावर सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून नोंद घेऊन कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या पत्रात पुढे म्हटले आहे की, उदयनिधी यांच्या टिप्पणीमुळे सामाजिक सौहार्दता बिघडू शकते. त्यामुळे त्यांच्या द्वेषपूर्ण भाषण प्रकरणाची स्वत:हून नोंद घेतली जावी. उदयनिधी यांच्या वक्तव्यामुळे सनातन धर्माचे पालन करणारे भारतातील बहुतांश लोक दुखावले आहेत. त्या टिप्पणीमुळे भारतातील सामान्य लोकांचे आत्मे आणि हृदय दुखावले गेले आहे.