मुंगेर (बिहार) येथे मुसलमानांच्या मिरवणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासाने १८ मंदिरे आणि ८ पुतळे यांना पुरवले संरक्षण !

मुसलमानांनीच केली होती मागणी !

राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना पुरवलेले विशेष संरक्षण

मुंगेर (बिहार) – येथे मुसलमानांच्या ‘चेहल्लुम’ सणाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी मुसलमानांच्या मिरवणुकीच्या मार्गावरील हिंदूंची १८ मंदिरे, तसेच राष्ट्रपुरुषांचे ८ पुतळे यांना विशेष संरक्षण पुरवले आहे. यांच्या भोवती बांबूंचे अडथळे निर्माण केले आहेत.  भाजप आणि स्थानिक नागरिक यांच्या विरोधानंतर महापुरुषांच्या पुतळ्याच्या येथे लावण्यात आलेले अडथळे हटवण्यात आले आहेत.

१. पोलिसांनी आयोजित केलेल्या शांती समितीच्या बैठकीत मुसलमानांनी मागणी केली होती की, मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व मंदिरे आणि पुतळे यांना संरक्षण पुरवण्यात यावे. त्यानंतर पोलिसांनी वरील नियोजन केले. छत्रपती शिवाजी महाराज, भगत सिंह, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित दीनदयाल उपाध्याय आदींच्या पुतळ्यांचा यात समावेश आहे.

२. मंदिरांना संरक्षण पुरवण्यात आल्याने आणि अडथळे निर्माण केल्याने हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच भाजपने प्रशासनाला पुढील २४ घंट्यांत लावण्यात आलेले अडथळे दूर करण्याची चेतावणी दिली आहे.

३. मुंगेर येथील भाजपचे आमदार प्रणव कुमार यांनी म्हटले की, अशा प्रकारचे मंदिरे आणि पुतळे यांच्या भवती अडथळे लावून बंद करणे चुकीचे आहे. हिंदूंचा सर्वांत मोठा सण नवरात्र असतो. त्या वेळी येथे साधूंच्या आखाड्यांच्या मिरवणुका निघतात, तेव्हा कधीच अडचण येत नाही.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या मंदिराना संरक्षण पुरवण्याची मुसलमान मागणी का करतात ? याचे उत्तर मुसलमान आणि बिहार पोलीस यांनी दिली पाहिजे !
  • हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर मशिदींवरून आक्रमण केले जाते, हे ठाऊक असतांना पोलीस कधी अशा मशिदींच्या ठिकाणी पोलीस तैनात करत नाहीत, हे लक्षात घ्या !