गुजरातमध्ये हनुमानाची अवमानकारक भित्तीचित्रे पुसून टाकली : एकास अटक

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

कर्णावती – गुजरातमधील बोटाड जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री हनुमान मंदिरात स्वामीनारायण संप्रदायाचे संत सहजानंद स्वामी यांच्यासमोर हनुमान गुडघे टेकून नतमस्तक झाल्याची चित्रे भिंतीवर रेखाटण्यात आली होती. ही चित्रे काही व्यक्तींनी पुसून टाकली. या प्रकरणी पोलिसांनी हर्षद गढवी नावाच्या व्यक्तीला कह्यात घेतले. अलीकडेच काही हिंदु धर्मगुरूंनी सालंगपूर येथील श्री हनुमानाच्या मंदिरातील ही भित्तीचित्रे हटवण्याची मागणी केली होती. (कुठल्याही चित्राच्या माध्यमातून हिंदु देवतांचा आणि हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर केला जात नाही ना, याकडे मंदिर व्यवस्थापनाने लक्ष द्यायला हवे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक)

या मंदिर व्यवस्थापनाने काही मासांपूर्वी हनुमानाची ५४ फुटांची मूर्ती मंदिरात बसवली होती. या मूर्तीचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले होते.

मंदिराच्या एका भिंतीवर चित्रे रेखाटण्यात आली असून त्यामुळे वाद निर्माण झाला होता. यापूर्वी प्रसिद्ध कथाकार मोरारी बापू, शारदापिठाचे शंकराचार्य आणि कर्णावती येथील भगवान जगन्नाथ मंदिराचे दिलीप दासजी यांनी या भित्तीचित्रांना विरोध दर्शवला होता.