श्रावण कृष्ण द्वितीया (१.९.२०२३) या दिवशी देवद येथील सनातनच्या आश्रमात पूर्ण वेळ साधना करणारे आणि ६६ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. शंकर नरुटे यांचा ३९ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने देवद आश्रमात सेवा करणार्या कु. मनीषा शिंदे यांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
श्री. शंकर नरुटे यांना ३९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. साधनेत साहाय्य करण्याची वृत्ती
‘मी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात नवीनच आले होते. त्या वेळी शंकरदादा (श्री. शंकर नरुटे) मला म्हणाले, ‘‘ताई, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला काही वाटले, तर मोकळेपणाने सांगा आणि निश्चिंतपणे रहा.’’ त्यांच्या या एका वाक्याने मला पुष्कळ उभारी आली. मी मिरज येथील आश्रमात असतांना त्यांनी माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होण्याच्या दृष्टीने मला पुष्कळ साहाय्य केले होते. त्यांना माझे स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांविषयी माहिती असल्यामुळे मला त्यांच्याशी मोकळेपणाने बोलून साधनेसाठी साहाय्य घेता येते. त्यांच्याशी बोलल्यावर माझे मन हलके होते, माझा उत्साह वाढतो आणि प्रयत्नांना गती मिळते.
२. सेवा करतांना स्वतःचा विचार नसणे
एखादा कार्यक्रम अथवा सेवा असली की, दादा ऊन-पाऊस आणि तहान-भूक विसरून सेवेत मग्न रहातात.
३. चुकांची भीती दूर करण्यासाठी साधिकेला साहाय्य करणे
‘चुकांची भीती वाटणे’, हा माझा साधनेतील मोठा अडथळा होता. मला माझ्या चुकांची भीती वाटायची. त्यामुळे मला ‘कुठलेही दायित्व घेऊ नये’, असे वाटायचे. एकदा माझ्याकडून झालेल्या एका चुकीची दादांनी मला जाणीव करून दिली; परंतु मी ती चूक स्वीकारली नाही. तेव्हा दादांनी मला सांगितले, ‘‘तुमच्या चुका सांगणे’, ही माझी साधना आहे.’’ त्यानंतर मी ‘माझे कुठे चुकले ?’, हे शोधण्याचा प्रयत्न करून त्यावर उपाययोजना करू लागले. हळूहळू माझी चुकांविषयीची भीती अल्प होऊन मला सहजतेने चुका स्वीकारता येऊ लागल्या. त्यामुळे मला दायित्व घेऊन सेवा करायला जमू लागल्या.
४. पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्याप्रती शंकरदादांचा उत्कट आदरभाव असतो.
५. श्री. शंकरदादा सतत शिकण्याच्या स्थितीत असतात.
६. सूक्ष्मातून जाणण्याची क्षमता
दादा इतरांच्या मनातील विचार न सांगताही अचूक ओळखतात. एखाद्या सूत्राविषयी त्यांच्याशी बोलायचे असते, तेव्हा ‘ते नेमके समोर येऊन थांबतात आणि त्याच सूत्राच्या संदर्भात बोलतात’, असे अनेकांना जाणवते.
हे कृपाळू भगवंता, तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘शंकरदादांचे हे गुण माझ्यातही येऊ देत’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना !
– कु. मनीषा शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.३.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |