‘आत्मविद्या मिळवण्यासाठी जितकी तळमळ असेल, तितके तुमचे शरीर संयमी होईल. त्यामुळे मनाचे संसाराप्रती असणारे आकर्षण न्यून होईल. संसाराचे आकर्षण जितके न्यून होईल, तितके तुमचे मन प्रसन्न राहील. जितके संसाराचे आकर्षण न्यून होईल आणि आत्मविद्या मिळविण्याची तत्परता राहील, तितकी मनुष्याची मती दिव्य बनेल.’
(संदर्भ : लोक कल्याण सेतू, मार्च २०२१)