सरकारी भूमीवर अनधिकृत बांधकाम होऊ दिले नसते, तर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्याचा गुन्हा घडला नसता !

‘जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे २९ जुलै २०२३ या दिवशी मोहरमच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या फेरीत ३३ मुसलमानांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. पोलिसांनी सर्वांवर गुन्हा नोंदवला. या  ३३ आरोपींपैकी १३ जणांची घरे प्रशासनाच्या भूमीवर अनधिकृत नियंत्रण मिळवून बांधण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संबंधित १३ जणांना १५ दिवसांत हे अतिक्रमण स्वत:हून हटवण्याची नोटीस देण्यात आली आहे. तसेच या  १३ जणांना एकूण १ कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.’ (१४.८.२०२३)