‘पू. बाबांची (पू. सत्यनारायण तिवारी यांची) प्रकृती ठीक नाही. त्यामुळे आम्ही (मी, आई (सौ. सविता तिवारी) आणि पू. बाबा यांनी) संगणकीय प्रणालीद्वारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्सव’ पाहिला.
१. ब्रह्मोत्सवाला आरंभ झाल्यावर पू. बाबांनी १ – २ वेळा तिन्ही गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) विराजमान झालेल्या दिव्य रथाकडे पाहिले. नंतर ते बराच वेळ ध्यानस्थितीत होते.
२. सोहळ्यात ‘आत्मारामा आनंदरमणा’ या गीताचे गायन चालू झाले. तेव्हा पू. बाबांनी ध्यानस्थितीतून डोळे उघडले आणि त्यांनी आनंदाने हातवारे केले. तेव्हा ते ‘आत्मानंद अनुभवत आहेत’, असे मला आणि आईला जाणवले.’
– होमिओपॅथी डॉ. (सुश्री (कु.)) आरती तिवारी, नागेशी, फोंडा, गोवा. (१६.५.२०२३)
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव ‘ऑनलाईन’ पहातांना सौ. सविता सत्यनारायण तिवारी (वय ७२ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती !
१. कार्यक्रम चालू झाल्यापासून शेवटपर्यंत माझे नामस्मरण सतत होत होते.
२. माझ्या मनात सतत एकच विचार होता, ‘आपल्या जीवनात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले परमेश्वराच्या रूपाने आले आहेत.’
३. ‘कलियुगात आपण त्यांचे ब्रह्मोत्सवाच्या माध्यमातून दर्शन घेत आहोत’, या विचारानेच मला पुष्कळ आनंद होत होता.
४. मी साधारण ४ – ५ घंटे सतत एका ठिकाणी बसून हा सोहळा पाहिला, तरीही मला थकवा आला नाही; उलट उत्साहच वाटत होता.
५. कार्यक्रमाच्या आरंभापासून मला आनंद जाणवत होता. नंतर त्या आनंदात वाढ होत गेली.
६. ‘सोहळा संपूच नये’, असे मला वाटत होते.’
– सौ. सविता तिवारी, नागेशी, फोंडा, गोवा. (१६.५.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |