घेऊया श्रीहरिस्‍वरूप गुरुमाऊलींचे दर्शन ।

‘प्रत्‍येक साधक साक्षात् विष्‍णुस्‍वरूप गुरुमाऊलींच्‍या (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या) सत्‍संगाची चातकाप्रमाणे वाट पहात असतो. साधक विष्‍णुस्‍वरूप गुरुमाऊलींच्‍या सत्‍संगाला त्‍यांच्‍याविषयी अपार भाव घेऊन जातो आणि त्‍यांचे रूप डोळ्‍यांत साठवून तृप्‍त होतो. श्री गुरुमाऊलींच्‍या दर्शनाला जातांना साधकाची होणारी अवस्‍था आणि श्री गुरुमाऊलींचीही साधकांना भेटतांना होणारी मनाची स्‍थिती, या कवितेत देत आहे. देवाची स्‍थिती मांडण्‍यासाठी माझी मती अल्‍प आहे, तरीही त्‍यांनीच सुचवलेले या कवितेत मांडत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. परात्‍पर गुरुमाऊलींच्‍या सत्‍संगाला जातांना साधिका एकमेकींच्‍या मुखावरील आनंद बघून जणू म्‍हणतात,

चला चला गं सयांनो (टीप),
आज विष्‍णुदर्शनाचा आनंद जाहला ।
पहाण्‍या त्‍या मनोहारी श्रीहरिस्‍वरूप
गुरुमाऊलींच्‍या छबीला ॥ १ ॥

सौ. अनघा जोशी

सया म्‍हणती, आज होणार आपल्‍याला श्रीहरीचे दर्शन ।
दर्शनाने तृप्‍त होणार । आपुले नयन ॥ २ ॥

ज्ञानामृताचा कुंभ वहाणार । श्रीहरीच्‍या मुखातूनी ।
उद्धार होण्‍या सकल जिवांचा,
जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतूनी ॥ ३ ॥

सांगती सया विसरलो देहभान, श्रीहरीच्‍या सहवासातूनी ।
धरूनी मनी हीच इच्‍छा, लाभो हा सहवास क्षणोक्षणी ॥ ४ ॥

साठवून अंतर्मनी ते तेजःपुंज रूप,
धन्‍य जाहलो आम्‍ही ।
शरणागतभावे ठेविला माथा आम्‍ही,
श्रीविष्‍णुस्‍वरूप गुरुमाऊलींच्‍या चरणी ॥ ५ ॥

ते चरण ना सोडविती, विरहिणी जाहली स्‍थिती सयांची ।
धरूनी आस मनी, श्रीविष्‍णुरूप गुरुमाऊलीच्‍या
पुढील दर्शनाची ॥ ६ ॥

देवा, नको जाऊस दूर; सदा रहा आमुच्‍या अंतरी ।
जड अंतःकरणे निरोप घेतो,
आशिष राहो तुझा सदा आमुच्‍यावरी ॥ ७ ॥

टीप – येथे ‘सया’ हा शब्‍द ‘साधका’चे प्रतिकात्‍मक रूप म्‍हणून वापरला आहे.

२. परात्‍पर गुरुमाऊलींची साधकांना भेटल्‍यावर होणारी स्‍थिती !

पाहूनी माझ्‍या साधकांना, दाटे आनंद माझ्‍या उरी ।
साधकांवर कृपा करण्‍या,
माझा आशिष सदा असे साधकांवरी ॥ १ ॥

या कलियुगे जाहलो प्रगट मी, माझ्‍या साधकांसाठी ।
करण्‍या साधकांचा उद्धार, जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतूनी ॥ २ ॥

– सौ. अनघा शशांक जोशी (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के, वय ४२ वर्षे), महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा.

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक