सांगली – सांगलीचे युवराज राजे प्रतापसिंह यांच्या ८१ व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी जिजामाता बाल मंदिर आणि सांगलीकर यांच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री. शरद फडके म्हणाले, ‘‘प्रतापसिंह यांचा संगमरवरी पुतळा दुर्लक्षित असून तो काळपट पडला आहे. त्यांच्या पुतळ्याच्या मागील भिंतीची दुरवस्था झाली आहे. याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे.’’ या वेळी अरुणा देशपांडे, डॉ. लता देशपांडे, मुख्याध्यापिका राजश्री दिगे, जयश्री दातार, संदीप थोरात, ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्रबुद्धे उपस्थित होते.