सातारा, २३ ऑगस्ट (वार्ता.) – भाऊ आणि वहिनीच्या आत्महत्येच्या अन्वेषणात पोलीस दिरंगाई करत असल्यामुळे फलटण तालुक्यातील मांडवखडक येथील धनंजय ननावरे यांनी स्वत:चे बोट छाटून घेतले.
नंदकुमार ननावरे यांनी पत्नीसह मुंबई येथील रहात्या घराच्या गच्चीवरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. भावाच्या आत्महत्येचे अन्वेषण पोलीस नीट करत नसल्यामुळे नंदकुमार यांचे बंधू धनंजय ननावरे यांनी ध्वनिचित्रीकरणाद्वारे न्याय मिळेपर्यंत शरिराचा एक-एक अवयव छाटून तो शासनाला भेट देण्याची चेतावणी दिली आहे. या चेतावणीनुसार त्यांनी स्वत:चे बोट छाटून घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा नोंद केलेला नाही; मात्र धनंजय ननावरे यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात भरती केले आहे.
संपादकीय भूमिकासमाजाने असा मार्ग न अवलंबण्यासाठी पोलिसांनी जनतेला वेळेत प्रतिसाद देणे आणि आश्वस्त करणे आवश्यक ! पोलीस जनतेला असा विश्वास कधी देतील ? |