४१ व्‍या अखिल भारतीय ज्‍योतिष अधिवेशनाचे उद़्‍घाटन !

४१ व्‍या अखिल भारतीय ज्‍योतिष अधिवेशनाचे उद़्‍घाटन

पुणे – ‘भालचंद्र ज्‍योतिर्विद्यालय (पुणे)’ आणि ‘प्राचार्य रमणलाल शहा ज्‍योतिष अकादमी (सातारा)’ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने पुणे येथे ४१ व्‍या अखिल भारतीय ज्‍योतिष अधिवेशनाचे उद़्‍घाटन २० ऑगस्‍ट या दिवशी झाले. या अधिवेशनामध्‍ये २७ ज्‍योतिष संस्‍थांसह संपूर्ण भारतातून अनुमाने १ सहस्र मान्‍यवर ज्‍योतिर्विद सहभागी झाले आहेत. येथील उद्यान प्रसाद सभागृहामध्‍ये २० आणि २१ ऑगस्‍ट या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत हे अधिवेशन पार पडले. दोन्‍ही दिवशी राष्‍ट्रीय आणि आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीच्‍या ज्‍योतिर्विदांनी उपस्‍थितांना मार्गदर्शन केले. या वेळी प्रतिष्‍ठेचा समजला जाणारा ‘ग्रहांकित जीवनगौरव’ पुरस्‍कार सांगलीचे आर्.के. बन्‍ने (अण्‍णा) यांना प्रदान केला, तर ‘डॉ. जयश्री बेलसरे कार्य गौरव’ पुरस्‍कार यंदा ज्‍योती जोशी यांच्‍या ज्‍योतिषीय संस्‍थेला देण्‍यात आला. ज्‍योतिष पहाण्‍याचे विविध मार्ग असले, तरी अंतप्रेरणा महत्त्वाची आहे. अंतप्रेरणा ही साधनेने निर्माण होते. त्‍यामुळे त्‍यावर भर द्या, असे अधिवक्‍त्‍या सुनीता पागे म्‍हणाल्‍या.