आसक्‍तीमुळे खरे ज्ञान होत नाही !

‘ज्‍याच्‍यात आसक्‍ती किंवा द्वेष असतो, तो सत्‍याचे निरूपण करू शकत नाही; कारण ती आसक्‍ती त्‍याच्‍या ज्ञानाशी जुळून जाते. अशा स्‍थितीत तो स्‍वतःविषयी किंवा दुसर्‍याविषयी योग्‍य निर्णय घेऊ शकत नाही. आसक्‍ती ज्ञानाला भ्रष्‍ट करून टाकते. सत्‍याच्‍या ज्ञानाला भ्रष्‍ट करणारे काही असेल, तर ती आसक्‍ती आहे.’

– स्‍वामी अखंडानंदजी