नाशिक – इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डोंगरदर्यांत शिरून महिला अंमलदारांनी थेट हातभट्ट्यांवर धाडी घातल्या. त्यांना कुर्हाड, पहार आदी साहित्य देण्यात आले होते. नाशिक पोलीस अधीक्षकांनी ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतील अवैध दारूची ठिकाणे नेस्तनाबूत करण्याचे आदेश दिले होते. गेले ७ मास विविध पथके कार्यान्वित करून २ सहस्र ८०० गुन्हे नोंद करण्यात आले होते. आता ८ महिला पोलिसांचा समावेश असणारी ४ पथके सिद्ध करून दुर्गम भागातील गावठी दारू, हातभट्ट्या यांचे अड्डे उद़्ध्वस्त करण्यात आले. गेल्या ४ दिवसांत ६ गुन्हे नोंद झाले असून दीड लाखांहून अधिक किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.