मिरज येथे अभ्यासिकेचे उद्घाटन !

अभ्यासाच्या उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करतांना जिल्हा न्यायाधीश मुकुंद दाते, मागे श्री. ओंकार शुक्ल, तसेच अन्य

मिरज – मिरज ट्रस्ट आणि ब्राह्मण परिवार महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानातून ‘श्रीमंत नारायणराव तात्यासाहेब करिअर डेव्हलपमेंट सेंटर’च्या अभ्यासिकेचे उद्घाटन मिरज येथे झाले. प्रारंभी जिल्हा न्यायाधीश मुकुंद दाते आणि पोलीस निरीक्षक मुकुंदराव कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश मुकुंद दाते म्हणाले, ‘‘मिरज शहरातील विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेची आवश्यकता होती. अभ्यासिकेच्या वतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर शिबिर आयोजित करावीत.’’ ब्राह्मण परिवार महाराष्ट्रचे श्री. ओंकार शुक्ल म्हणाले, ‘‘मिरजेचे सरकार श्रीमंत गोपाळ राजे पटवर्धन यांनी ही जागा उपलब्ध करून दिली. अभ्यासिकेसमवेत मुलांचे भवितव्य घडावे, असा या उपक्रमाचा उद्देश आहे.’’

स्वागत सौ. सुजाता रक्तवान यांनी केले, तर आभार श्री. श्रीपाद भट यांनी मानले.