मुंबई, १५ ऑगस्ट (वार्ता.) – महाराष्ट्र राज्याचा पहिला ‘उद्योगरत्न पुरस्कार’ पद्मविभूषण आणि टाटा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष रतन टाटा यांना घोषित केला आहे. यासह ‘उद्योगमित्र पुरस्कार’ सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला, तसेच उत्कृष्ट महिला उद्योजक पुरस्कार (महाराष्ट्र) श्रीमती गौरी किर्लोस्कर आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार (महाराष्ट्र) विलास शिंदे यांना घोषित केला आहे. राज्याच्या उद्योग विभागाकडून हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.