छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत गट ‘क’ संवर्गातील ४ सहस्र ६४४ तलाठी पदांच्या भरतीसाठी तीन टप्प्यांत परीक्षा होणार आहे. यासाठी परीक्षार्थींनी निवडलेल्या तीन केंद्रांऐवजी इतरत्र परीक्षा केंद्र दिल्याने तलाठी परीक्षा केंद्र वाटपात गोंधळ झाला. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथील विद्यार्थ्यांना नागपूर आणि अमरावती येथील परीक्षा केंद्र देण्यात आले. त्यामुळे त्यांनी केंद्र पालटून देण्याची, तसेच एस्.टी.चा खर्च देण्याचीही मागणी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर ते नागपूर हे अंतर ४५० किलोमीटरचे आहे, तर अमरावती ते छत्रपती संभाजीनगर हे अंतरही ३१३ किलोमीटर इतके आहे. त्यामुळे विद्यार्थी संतप्त आहेत.
संपादकीय भूमिकातलाठी भरती परीक्षेतील भोंगळ कारभार ! |