भारतात हिंदु मूल्यांसहित शक्तीशाली आणि वस्तूनिष्ठ लोकशाही विद्यमान !

भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनी नेदरलँड्सच्या खासदाराकडून गौरवोद्गार  !

नेदरलँड्स येथील खासदार गीर्ट विल्डर्स

नवी देहली – भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मी त्याचे अभिनंदन करतो. भारतात शक्तीशाली लोकशाही अस्तित्वात असली, तरी हिंदु ओळख आणि मूल्ये जोपासली जातात. मी भारतीय आणि हिंदु लोकांशी असलेल्या मैत्रीचे जतन करतो. मी भारतावर प्रेम करतो, असे गौरवोद्गार नेदरलँड्स येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’ पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार गीर्ट विल्डर्स यांनी काढले.